भाईदर – गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा यांनी एटीएम कार्डची चोरी करून, नंतर त्या एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या ३ आरोपीना गुजरात राज्यातुन अटक करण्यात यश. मिळालेल्या माहिती नुसार भाईदर पुर्व, बंदरवाडी जवळ, लक्ष्मी टॉवर, नवघर रोड, याठिकाणी असलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दिनांक १७/०४/२०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास अनिल लक्ष्मण जाधव वय ५९ वर्षे, रा- सी/२११,भालचंद्र कॉम्प्लेक्स, सुदर्शन लेन, नवघर रोड, भाईदर पुर्व हे त्याच्या खात्याचे मिनी स्टेटमेट काढण्याकरीता गेले असता त्याचे एटीएम कार्ड हे मशिन मध्ये अडकले ते काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन देखील निघाले नाही. त्या वेळी एटीएम सेंटर मध्ये एक अनोळखी इसम आला व त्याने फिर्यादी यांना एटीएम चा पिन टाकण्यास सांगितले व फिर्यादी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन पिन नंबर टाकुन कॅन्सल बटन दाबले परंतु एटीएम कार्ड बाहेर आले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याकरीता फोन करत तसेच मित्रांना फोन करीत एटीएम च्या बाहेर आल्या नंतर एका अज्ञात इसमाने त्यांचे एटीएम कार्ड चोरी केले व त्याव्दारे वेगवेगळ्या एटीएम मधुन एकुण ५०,०००/- रुपये फिर्यादी यांच्या खात्यातुन चोरी केले. याची फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
सदर गुन्हयाचा मा. वरिष्ठांचे आदेशा प्रमाणे गुन्हे शाखा कक्ष- ०१ काशिमीरा मार्फत समांतर तपास करण्यात येत होता . पोलिसांना सदर गुन्हयांच्या घटनास्थळावरुन मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाव्दारे यातील आरोपी निष्पन्न करुन ते वापी राज्य गुजरात याठिकाणी वास्तव्यास असल्याची माहीती गुप्त बातमीदार याच्या मार्फत मिळण्यात आली त्याऊर्न मा. वरिष्ठांचे परवानगीने वापी याठिकाणी पोलीस पथक रवाना करुन आरोपी १) शिवशंकर रामु प्रसाद वय २५ वर्षे, धंदा – मजुरी, रा.- गाव झोझुरी, तालुका- बरखटटा राज्य-झारखंड २ ) प्रिन्स विनोद जयस्वाल वय २८ वर्षे, धंदा – चालक, रा- रुम नं २०१, सोमा रेसिडन्सी, वापी, जि-वलसाड, राज्य गुजरात, कायमचा पत्ता- गाव –पांडेचा चौराहा, ता-रामपुर कारखाना, जि-देवाडीया, उत्तर प्रदेश ३) उपेद्र सिंग रामप्रवेश सिंग वय ४५ वर्षे,धंदा – मजुरी, रा. रुम नं ए/४३९ रा. – सोसायटी, ता-पलसाना, जि-सुरत यांना गुंजन चौफुला, वापी, राज्य गुजरात या ठिकाणाहुन ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नवघर पोलीस ठाणे, मिरारोड, वसई, विरार, मालाड, कांदीवली, बोरीवली, माहीम, जोगेश्वरी, अंधेरी याठिकाणी देखील अश्याच प्रकारे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी यांना पुढील कारवाईकामी नवघर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो. निरी अविराज कुराडे, सपोनिरी प्रशांत गांगुर्डे, सपोनिरी पुष्पराज सुर्वे, पोहवा /संतोष लांडगे, पो. हवा./सचिन हुले, पो. हवा विजय गायकवाड, पो.हवा/समिर यादव, पो.हवा./ सुधीर खोत, पो.कॉ./सनी सुर्यवंशी, पो.शि./धिरज मेंगाणे, स. फौज. सतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास नवघर पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे.
