भाईंदर : घरगुती हुक्का पार्लरवर दिनांक ६/०६/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची संयुक्तरित्या कारवाई केली आहे.
दिनांक ०४.०६.२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती कि करण जोशी हा रुम मध्ये जी/०८ सिध्दार्थ को. ऑ. सोसायटी, भाईंदर पश्चिम याठिकाणी हा तंबाखुमिश्रीत प्रतिबंधीत हुक्का उपलब्ध करुन देत असून ग्राहकांना हुक्का पुरवित आहे.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. देविदास हंडोरे यांनी वरिष्ठांना माहिती देवून पुर्तता करुन सदर ठिकाणी पंच व पोलीस पथकासह दिनांक ०४/०६/२०२२ रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी कोणताही परवाना न घेता रुममध्ये १) करण भरत जोशी, याने नियोजन करुन त्याच्यासोबत वेटर म्हणुन काम करणारे २) रॉकी राज शर्मा, ३) जिग्नेश विनोदभाई शहा, ४) बिल्ला सलीम अन्सारी, व ५) सुरज राजेश पुजारी याच्याबरोबर रुममध्ये ग्राहकांना तंबाखुमिश्रीत प्रतिबंधीत हुक्का उपलब्ध करुन देवुन सदर रुममध्ये हुक्का पुरवितांना पोलिसांना मिळून आले . पोलिसांनी कारवाई दरम्यान एकुण ७ ग्राहक हुक्का पित असताना मिळुन आले. पोलिसांनी तंबाखुमिश्रीत प्रतिबंधीत फ्लेवर व हुक्क्याचे साहित्य असा एकुण ११,२८३/- रुपयाचा मुद्देमालासह सर्वांना ताब्यात घेतले असून सदर आरोपींविरुद्ध पोहवा/अजय सपकाळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन भाईंदर पोलीस ठाणे येथे सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यावर निर्बंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप.आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री. देविदास हंडोर, सपोनि तेजश्री शिंदे-भरोसा सेल, पोहवा/धनाजी इंगळे, पी. डी. टक्के, ए. आर. सपकाळ, एस. ए. आव्हाड, पोशि. ओ. बी. यादव, व पो. हवा. व्ही. ए. घरबुडे तसेच – अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदरचे सहापोउपनि/उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र एस. पाटील, पोशि/ केशव शिंदे यांनी संयुक्त कारवाई केली आहे.
