बांद्रा : दिनांक ०६/११/२०२१ रोजी मारुती मिरकर यांना चर्चगेट लोकलमध्ये एक बेवारस बॅग दिसून आली त्या बाबत त्यावेळी ड्युटी वर असणारे पोहवा पवार, पोशिएस.आर.भालेराव यांना त्याबद्दल कळविले नमूद अंमलदारांनी तात्काळ गाडी व डबा अटेंड केला असता त्यांना त्या डब्यात एक काळ्या रंगाची सॅकबॅग दिसून आली त्यांनी ती लागलीच ताब्यात घेवून स्टेशन मास्तर, सांताक्रूझ रेल्वे स्टेशन यांचे कक्षात घेवून हजर झाले. सदर सॅकबॅगमध्ये विनोद वसंत पवार, वय ३२ वर्षे, राह. साकीनाका, अंधेरी. असे एक ओळखपत्र देखील मिळून आल्याने पोहवा/पवार यांनी सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्या कडे सॅकबॅगबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची सॅकबॅग लोकलगाडीमध्ये विसरुन राहीली असल्याचे सांगीतलेवरुन त्यांना सॅकबॅग मिळून आलेली असून सदरची सॅकबॅग आतील मालमत्तेसह स्टेशन मास्तर, सांताक्रूझ रेल्वे स्टेशन यांचे उपस्थितीत त्यांना परत करण्यात आली आहे. विनोद पवार यांनी बांद्रा रेल्वे पोलीस यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त केले . ठाणे : गौरी शंकर भट्ट वय : ५३ या बंगलोर ते सीएसएमटी एक्स्प्रेस ने प्रवास करीत असताना दातिविली रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी त्यांच्या हातात असलेली बॅग नकळत त्यांच्या हातातून निसटली याबाबत त्यांनी ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे येवून तक्रार दाखल केली त्यावरून या रेल्वे पोलीस ठाणे (चालत्या एक्सप्रेस गाडीतून पडलेली सॅकबॅगचा शोध घेवून प्रवाशास परत केलेबाबत). रात्रपाळीवर असणारे प्रभारी पोउपनिरीक्षक सापटे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ ठाणे रेल्वे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोशि पाटील, पोशि कुलकर्णी तसेच दिवा स्टेशन डुटी वर असणारे पोना सोनावणे, पोशि पठारे असे दिवा ते दातीवली दरम्यान चालत जाऊन पाहणी केली असता सदर बॅग मिळुन आली असता सदर बॅग ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे आणून बॅगमधील वस्तूची खात्री करून ती त्यांचीच असल्याची शहानिशा करून त्याच्या ताब्यात देण्यात आली . त्यांनी ड्युटीवरील रेल्वे पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.कुर्ला : चंद्रशेखर पांडुरंग मोरवेकर, वय ४४ वर्षे, हे सीएसटी लोकलने प्रवास करत असताना त्यांची बॅग रेल्वे च्या डब्यामध्ये विसरले अशी तक्रार हेल्पलाईन वर केली असता सपोफौ चव्हाण, पोशि पटेकर, पोशि रेपाळे असे ड्युटी वर असताना दि.०६/११/२०२१ रोजी सदर गाडी अटेंड करून बॅग ताब्यात घेतली व मोरवेकर यांना संपर्क साधून मुलुंड रेल्वे स्टेशन येथे बोलावून सदर बॅग व सामान याची खात्री करून ती बॅग त्यांच्या ताब्यात दिली . तरी त्यांनी कुर्ला रेल्वे पोलिसांचे मनापासून आभार मानले. त्याचप्रमाणे मुलुंड येथे सपोफौ पिसे, पोहवा कुटे, मपोहवा जगताप, पोशि जाधव, पोना टाकळकर ड्युटी वर असताना दिनांक ०५/११/२०२१ रोजी हेल्पलाईन वरुन पोहवा डायना यांना फोन कॉल करुन सांगितले कीप्रवासी राजेंद्र चौधरी वय २४ वर्षे, हे कल्याण ते मुंब्रा असा प्रवास करीत असताना त्यांची राखाडी रंगाची सॅक बॅग सीएसएमटी लोकल डब्यात विसरुन राहिली असता त्यांनी हेल्पलाईन येथे फोन केला असता त्यांनी पिसे यांना सदर लोकल चेक करा असे सांगितले ,तरी सदर लोकल चेक केली असता बॅग मिळुन आली आहे. बॅगेत पोलीस युनिफॉर्म, सरकारी बेल्ट नं.७७४२ ठाणे शहर पोलीस असे मिळुन आले आहे. सदर बॅग सदर राजेंद्र चौधरी त्याच्या ताब्यात दिली आहे. तरी त्यांनी कुर्ला रेल्वे पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे : पोलीस आयुक्त साहेब लोहमार्ग मुंबई यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहीम अंतर्गत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे वपोनि यांचे मार्गदर्शना खाली रुस्तम अली रफीक अली अन्सारी, वय ४५ वर्षे, चा चोरीस गेलेला रियलमी सी ११ कंपनीचा मोबाइल फोन हा दिनांक ०६/११/२०२१ रोजी वरील परत करण्यात आलेला आहे. चोरीस गेलेला मोबाइल फ़ोन मिळून आल्याने अन्सारी यांनी पोलिसांचे खूप खूप आभार मानले आहेत. बोरीवली : सचिन कुमार पांडे, वय २२ वर्षे,यांचा हरवलेला मोबाईल माननीय पोलीस आयुक्त सो लोहमार्ग मुंबई,यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमेअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली परत देण्यात आला. सचिन पांडे यांनी मोबाईल परत मिळाल्यावर बोरीवली रेल्वे पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले व यापुढेही अशीच कामगिरी करावी या करीता शुभेच्छा दिलेल्या आहेत.वसई : सबीर भाई दागिणवाला, वय ७४ वर्षे यांचा मोबाईल हरवला अशी तक्रार वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे येथे केली त्यावरून वसई रोड पोलीस ठाणे अंतर्गत विरार रेल्वे टेशन येथे पोशि/ माने मपोशि /भालेकर असे विरार रेल्वे टेशन येथे दिवसपाळीवर कर्तव्यावर असताना तो मोबाईल फोन यार्डात मिळून आला सदर मोबाईल विरार रेल्वे चौकीत दागिणवाला यांना परत करण्यात आला त्याबाबत त्यांनी रेल्वे पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.
