डोंबिवली : डोंबिवली येथून गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन आरोपीस मानपाडा पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाणेच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक, साठा होत असल्यास, व त्यांचा शोध घेवुन सदर अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्याबाबत मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य ती कारवाई कारण्याचे आदेश दिले होते . त्याप्रमाणे अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक व साठा याचा शोध घेण्यात येत होता. दिनाक १/०४/२०२२ रोजी मानपाडा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यायांना माहिती मिळाली की, देसलेपाडा, डोंबिवली पुर्व येथील महावीर अपार्टमेंटमध्ये एका इसमाने गांजा हा अंमली पदार्थाचा विक्रीसाठी साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली सदर साठा करुन ठेवणाऱ्या इसमाचा तसेच अंमली पदार्थाचा शोध घेण्यासाठी सपोनिरी. सुनिल तारमळे व त्यांचे पथक यांना रवाना करण्यात आले होते.
सदर माहितीच्या आधारे सपोनिरी सुनिल तारमळे व त्यांचे पथकाने महावीर अपार्टमेंट, रुम नं. ३०२, एकतानगर, देसलेपाडा, डोंबिवली पुर्व या घरात छापा घातला असता, सदर घरात मयुर मधुकर जडाकर, वय २५ वर्षे, व अखिलेश राजन धुळप, वय २६ वर्षे, रा. हनुमान नगर, डोंबिवली पूर्व यांच्या कडे सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून १.८७,३१०/-रु चा ५ किलो ९०० ग्रॅम वजानाचा गांजा तसेच मोबाईल फोन, रोख रक्कम व गाजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व सदर घटनेबाबत मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन, सदर इसमांकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गांजा हा सुनिल उर्फ लोका दिलीप खजन उर्फ पावरा या त्यांच्या साथीदार याचेकड़न शिरपुर येथुन विकत आणलेला असल्याची माहिती दिली. सदर माहितीचे आधारे लाकडया हनुमान गाव, ता. शिरपुर, जि. धुळे येथुन आरोपी सुनिल उर्फ लोका दिलीप खजन उर्फ पावरा, वय २० वर्षे, यास धुळे येथून अटक करण्यात आलेली आहे. तसेच सदरचा गांजा हा शिरपुर परीसरातील लोक जंगली भागात गांजाचे उत्पादन घेत असतात. सदचा गांजा हा आरोपी मयुर जडाकर व अखिलेश धुळप हे शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षीत लोकांना विकत असावेत असा संशय पोलिसांना असल्यामुळे याची पुढील चौकशी चालू आहे.
सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, श्री. सचिन गुंजाळ, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, श्री.जे.डी.मोरे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. शेखर बागडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाळासाहेबत पवार, सहा.पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, पोना/ प्रशांत वानखेडे, पोना/अशोक कोकोडे, पोना/ सुशांत तांबे, पोशि/संतोष वायकर, पोशि तागचट सोनवने यांचे पथकाने केलेली आहे.
