दिनांक २८/०२/२०२२ रोजी सायंकाळी १८.०० वा.चे सुमारास महाशिवरात्री सणानिमीत्ताने मुबई आग्रा महामार्गाने अंमली पदार्थाची वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्याअनषंगाने पेट्रोलिंगकामी पोलीस निरीक्षक, दत्तात्रय शिंदे व पोलीस स्टाफ असे रवाना झाले होते. वरील पोलीस पथक हे लळींग टोल नाक्याच्या अलीकडे दरिया हॉटेल चे जवळ थांबून वाहने चेक करीत करीत असतांना रात्री ८. ०० च्या सुमारास टोल नाक्याजवळ धुळे कडून मुंबई कडे जाणारी ओपन जिप संशयीत वाटल्याने त्यास पो.नि. शिदे सो तसेच पोलीस पथकाने थांबण्याचा इशारा दिला परंतु सदर जिप न थांबल्याने जिपचा संशय बळावला म्हणुन जिपला टोल नाक्याजवळ थांबवुन त्यामधील इसमांच्या हालचाली व हावभाव संशयास्पद दिसुन आल्याने सदर जिप मधिल इसम (१) नदिम मोहम्मद शमीम सिद्दीकी वय ३२ ड्रायव्हर व मालक (२) असलमखान अलीयारखान पठाण वय ४० यांना जागीच पकडले. वरील वाहनातील दोन्ही व्यक्तींकडे १७,५०० रुपये किं.चा २.५ किलो गांजा, १५००० रु.किं.ची गावठी पिस्टल, २०० रु.किं.चे एक जिवंत काडतूस, एक काळे रंगाची ट्रॅव्हलींग बॅग, २०० रु.किं.चा एक रामपूरी चाकू, ३,५०,००० रु.किं.च्या वाहनासह एकुण ३,८२,९०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आला आहे. सदर प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोकॉ/मुकेश नानाभाऊ मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पो.नि.डी.एस.शिंदे हे करीत आहेत.
सदर कारवाई मा.प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव सो. उप विभा.पो.अधि.श्री. दिनकरराव पिंगळे सो.यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय शिंदे पोलीस निरीक्षक मोहाडी पो स्टे,असई/अशोक पायमोडे, पोना/ किरण कोठावदे, पोकॉ/प्रकाश जाधव, पोकॉ/मुकेश मोरे, चालक पोकॉ/ चेतन माळी गुन्हे शोध पथकातील हेकॉ/शाम काळे, प्रभाकर ब्राम्हणे, पोना/ राहुल पाटील, पोकॉ/गणेश भामरे, पोकॉ/जितेंद्र वाघ,सचिन वाघ, धिरज गवते, राहुल गुंजाळ, जय चौधरी अशांनी केली आहे.
