जोगेश्वरी– मेघवाडी पोलीस ठाणे येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या कडुन दोन पिस्तुल, जिवंत काडतुसे, दहा लाख रोख रक्कम हस्तगत करून गुन्हेगारांस जेरबंद केले. अधिकमाहितीनुसार दिं. ०५/०२/२०२५ रोजी रात्री ०९.०० वा. च्या सुमारास सपोनि सम्राट वाघ व पोशिक. दत्तात्रेय बागुल यांना गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद हा रामगड, पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी, पुर्व मुंबई ६० या ठिकाणी देशी बनावटीचे गावठी पिस्तुल (अग्निशस्त्र ) विक्री करीता घेवुन येणार आहे अशी गुप्त बातमीदारांकडुन माहिती प्राप्त झाली होती. सदरची माहिती लागलीच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघवाडी पोलीस ठाणे यांना दिली असता त्यांनी सपोनि वाघ व पथक यांना बातमीची खातरजमा करण्याचे आदेश दिले . मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने सपोनि वाघ,पोहवा माने, पो.शिपाई क. माने, या पथकाने रामगड, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, मेघवाडी, जोगेश्वरी, पुर्व येथे सापळा रचला असता त्यात. साधारण रात्री ०९.१० वा.च्या सुमारास एक इसम पाण्याच्या टाकीजवळ राममंदीरच्या दिशेने येवुन उभा राहीला.सदर इसमाकडे बोट दाखवुन गोपनीय बातमीदार यांने संशयित इसम तोच असल्याने सांगितले असता सपोनि वाघ व पथक यांनी नमुद इसमास घेराव घातला असता तो पळुन जावु लागला. त्यावेळी त्यास ताब्यात घेण्यात आले त्याने आपली ओळख गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद, वय – ३५ ते ४० वर्षे, धंदा – चालक, रा.ठी. रूम नं. १, अब्दुल हमीद चाळ, बाळ विकास शाळेजवळ, प्रेमनगर, जोगेश्वरी पुर्व, मुंबई ६० असे सांगितले.
त्यानंतर पंचासमक्ष सदर इसमाची अंगझडती घेतली असता आरोपीकडून १) १०,०००,००/- रू किंमतीच्या भारतीय चलनातील नोटा त्यामध्ये १०० रू दराच्या ८,२०० नोटा व २०० रू दराच्या ९०० नोटा काळया रंगाची बॅगमध्ये असलेले.२)१५,०००/- रू. अंदाजे किंमतीचा एक सिल्व्हर रंगाचा देशी बनावटीचा देशी कट्टा ( पिस्टल) ज्याच्या मुठला दोन्ही बाजुला चॉकलेटी रंगाचे प्लॅस्टीकच्या दोन पट्ट्या असलेले, पिस्टलवर USA ARMY 32.M.M Ok 7.6.5असे इंग्रजी मध्ये लिहलेले, त्यांची लांबी ६.५ इंच, रूंदी ४.८ इंच व सोबत मॅगझीन ४ इंच लाबी असलेली , ३) १५०००/- रू. अंदाजे किंमतीचा एक सिल्व्हर रंगाचा देशी बनावटीचा देशी कट्टा (पिस्टल) ज्याच्या मुठला दोन्ही बाजुला चॉकलेटी व पिवळया रंगाचे प्लॅस्टीकच्या दोन पट्ट्या असलेले, त्यांची लांबी ६.५ इंच, रूंदी ५ इंच व सोबत मॅगझीन ४.५ इंच लांबी असलेली.४) ६००/-रु. किमतीचे ०६ जिवंत काडतुसे त्यांच्या कॅपवर 7.65 KF असे इंग्रजीमध्ये लिहलेले.५ ) २००/- किंमतीचा एक स्टीलचा बॉक्स त्याला पितळी कुलुप असलेले (कुलुप तुटलेले) व दोन लाकडी व दोन फायबरचे मुठ कवर तसेच गुलाबी रंगाची पिशवी व एक हिरव्या रंगाचे पिस्टल कापडी हॉस्टर, मुद्देमाल हस्तगम करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली आहे. नमुद इसमाचा गुन्हे अभिलेख तपासला असता तो मेघवाडी पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. परमजीत सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुक्त श्री. संचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, मेघवाडी विभाग, श्री. संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मेघवाडी पोलीस ठाणे श्री. संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सम्राट वाघ,पोहवा माने,पोशि. बागुल, पोशि . क माने यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.
