प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे अंतर्गत मिरा-भाईंदर मधील स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने RTO उपकेंद्र कार्यालयाचा उदघाटन सोहळा दिनांक. २१/१२/२०२० रोजी मिरा- भाईंदर घोडबंदर येथे नव्याने महाराष्ट्र राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री एडवोकेट अनिल परब यांच्या हस्ते पार पडला.
सदर कार्यक्रमात खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, जिल्हा-प्रमुख प्रभाकर म्हात्रे, स्नेहल कंसारीया, परिवहन आयुक्त अविनाश ढाखणे, रवींद्र गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्री. डोले साहेब, पोलीस उप-आयुक्त संजय कुमार पाटील, साळुंके साहेब, विजयाआनंद सागर, जयंत पाटील, विहन शिंदे, प्रवीण पाटील, निलम धवन आणि अधिकारी उपस्थित होते.
सातत्याने पाठपुरावा करून कार्यालयाची जागा उदघाटनासाठी उपयुक्त करण्यात आली. गेली सात-आठ वर्षे अथक प्रयत्न करून मिरा-भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरच्या नागरिकांना ठाण्याला जाण्याची गरज न लागावी याकरिता परिवहन कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. या सुविधांमुळे मिरा-भाईंदरकरांना ठाण्याची पायपीट करावी लागणार नाही आणि लवकरच या सुविधांचा त्यांना लाभ घेता येणार आहे.
