पालघर– जबरी चोरी करून पळून गेलेल्या चार अज्ञात आरोपींना जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून अटक. अधिक माहितीनुसार दिनांक २८.०३.२०२५ रोजी रात्रौ ११.३० वाजताचे सुमारास फिर्यादी भोरू खंडू बिन्नर,वय ३० वर्षे, रा. खोडाळा, ता.मोखाडा, जि. पालघर, मुळ रा. मोडाळे, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक हे त्यांच्या पिकअप गाडीने जात असताना मौजे वावर गावचे हद्दित ता. जव्हार जि. पालघर येथे तीन अनोळखी इसम यांनी रस्त्यामध्ये मोटार सायकल आडवी उभी करुन ‘आमची गाडी बंद पडली आहे, आमची गाडी तुमच्या पिकअप गाडीमध्ये ठेवुन पुढील गावात सोडुन द्या’ असे सांगत असताना पिकअप गाडी चालक व फिर्यादी यांचे डोळयामध्ये मिरचीपुड टाकुन पिकअप गाडीमध्ये ड्रायव्हर सिटच्या पाठीमागे असलेली ६,८५,५००/- रुपये रोख रक्कम फिर्यादी यांच्या मानेवर कोयता ठेवुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा धाक दाखवुन बळजबरीने हिसकावुन नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जव्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/किशोर मानभाव, जव्हार पोलीस ठाणे यांना पोलीस पथक तयार करून तपास करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोउपनि / संजय भुसाळ, पोउपनि / दिघोळे, पोहवा / प्रदिप विटकर, पोहवा/ गायकवाड, पोहवा / नेहरे, पोना / सचिन भुसारा सर्व नेम. जव्हार पोलीस ठाणे यांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळी मिरची पुड मिळून आली. सदर मिरची पुड ही एका लग्न पत्रीकेत आणली असल्याचे दिसून आले. त्याआधारे तसेच तांत्रीक पध्दतीने तपास करून चार संशयीत आरोपी १) दत्तु खंडू बिन्नर वय ३४ वर्षे, रा. खोडाळा ता. मोखाडा जि. पालघर मुळ रा. मोडाळे, पो. साजेगाव, ता. इगतपुरी, जि. पालघर २) परमेश्वर कमलाकर झोले वय २४ वर्षे रा. धाडोशी, पो. सामुड्डी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक ३) दादा बाजीराव पेहरे वय २४ वर्षे, रा. भिलमाळ, पो. सामुड्डी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक, ४) किरण आनंता लामठे, वय २३ वर्षे, रा. भुरीटेक पैकी धांगडयाची वाडी, ता. मोखाडा, जि. पालघर यांचा शिताफिने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे कसून चौकशी केली असता आरोपी क्र. १ हा फिर्यादीचा भाऊ असून त्याने आरोपी क्र. २ ते ४ यांचे साथीने फिर्यादी यांना अडवून वरीलप्रमाणे जबरी चोरी करून ६,८५,५००/- रुपये रोख रक्कम पळवीली असल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपी यांना अटक करून वर नमूद रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हा पोउपनि/संजय भुसाळ, नेमणुक जव्हार पोलीस ठाणे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि / किशोर मानभाव, जव्हार पोलीस ठाणे, पोउपनि / संजय भुसाळ, पोउपनि/दिघोळे, पोहवा / प्रदिप विटकर, पोहवा / गायकवाड, पोहवा / नेहरे, पोना / सचिन भुसारा सर्व नेम. जव्हार पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
