मिरारोड– अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरात बनावट कागदपत्र तयार करुन वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिला नागरिक हिच्यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाची कारवाई. दिनांक २८/०३/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अनधिकृतपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरीक काशिमिरा पोलीस ठाण्याचे हद्दीतील गाळा नं. ०८ पुनम रेसिडेन्सी जवळ, शांतीपार्क मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली असुन ते समक्ष हजर राहुन दाखविणार आहे.
मिळालेल्या बातमीप्रमाणे कायदेशीर बाबींची पुर्तता करुन दुभाषीक व दोन पंचासमक्ष वर नमुद ठिकाणी ०४.४५ वा. सुमारास साफळा रचुन ०१ महिला बांगलादेशी नागरीक हिस महिला पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवुन तिच्याकडे केलेल्या चौकशीत, ति स्वतः बांगलादेशी नागरीक असुन सुध्दा तिने खोट्या कागदपत्रांचे आधारे भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड बनवुन त्याचा वापर केला तिस ताब्यात घेण्यात आले असुन सदर बाबत दोन पंचासमक्ष पोउपनिरी/ उमेश पाटील यांनी सविस्तर पंचनामा केला आहे. ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी महिला हिच्या विरुध्द मपोहवा / अश्विनी भिलारे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने काशिमीरा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोनि / देविदास हंडोरे, पोउपनिरी/प्रकाश तुपलोंढे, पोउपनिरी/ उमेश पाटील, सफौ / रामचंद्र पाटील, सफौ / राजाराम आसावले, मपोहवा/निशीगंधा मांजरेकर, पोहवा / किशोर पाटील, पोहवा/चेतनसिंग राजपुत,पोहवा / केशव शिंदे, मपोहवा / अश्विनी भिलारे व चापोहवा / सम्राट गावडे यांनी केली आहे.
