नालासोपारा– कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापाऱ्यास “सेंच्युरी प्लाय ” कंपनीचे मालक असल्याचे भासवून ५०,००,०००/- रुपयांची फसवणुक करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ यांना यश. मिलेल्या माहितीनुसार दिनांक ०१/०३/२०२५ रोजी अज्ञात आरोपींनी सिलीगुडी, कोलकत्ता येथील डॉ. अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल करुन त्यांच्या परिचयातील “ सेंच्युरी प्लाय” कंपनीचे मालक श्री भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांचेकडुन गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या वडीलांचे मार्फतीने ५०,००,०००/- रुपये घेवुन फसवणुक केली म्हणुन सदर बाबत दि. ०४/०३/२०२५ रोजी कोलकत्ता १६, पार्क स्ट्रिट पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने कलकत्ता, राज्य पश्चिम बंगाल येथील पोलीस पथक हे दिनांक १२/०३/२०२५ रोजी मा. श्री अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे यांना भेटले असता मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सदर प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवुन गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेण्या बाबत पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष- ३ यांना आदेशीत केले होते.सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान कौशल्यपुर्ण व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १) सैयद रियाज काझी, वय ३६ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. ग्लोरियस लाईफस्टाईल, रुम न.सी./१०५, स्कायहाईट बिल्डींगच्या पाठिमागे, नालासोपारा पश्चिम, २) वकप मोहम्मद जावेद चांदीवाला वय २८ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा. ग्रिन एव्हन्यु बिल्डींग, रुम नं. ए / २०७, करारीबाग, टाकीपाडा, नालासोपारा पश्चिम ३) सचिन मनोहर प्रसाद आर्यभट, वय ३२ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. मौर्या कंपाऊड चाळ, वाकनपाडा, नालासोपारा पूर्व यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनषंगाने चौकशी करता त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर आरोपींना पुढील कारवाई करीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक / संदिप दत्त अँन्टी रावडी सेक्शन डिटेक्टीव डिपार्टमेंट, लालबजार, कोलकत्ता पोलीस यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी मा. श्री मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त सो., मा. श्री दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त सो., मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो., (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त सो (गुन्हे) मि. भा. वि. व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / शाहुराज रणवरे, सहा.पो.निरी./ सुहास कांबळे, पो. हवा. / मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागरबारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पो.अं./ राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, म. सु. ब. / सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष- ३ यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
