भाईंदर – २७ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयांत फरारी असलेल्या आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष- १, काशिमीरा यांना यश.अधिकमाहीती नुसार दिनांक ०५/१०/१९९७ रोजी सकाळच्या सुमारास भाईंदर पूर्व एम.आय. उद्योगनगर, वासुदेव इंडस्ट्रीयल इस्टेट, गाळा नं. बी / १५, येथे विजयसिंग व त्याचे दोन साथीदार रा. साईसागर बिल्डींग, रुम नं. २१६, सी विंग, भाईंदर यांनी गटारात प्लास्टीक पिवशीतुन बिल्डींगवरुन कचरा टाकला त्यामुळे प्रमोदकुमार पांडे व त्यांचे साथीदार यांच्या अंगावर खराब पाणी उडवले व त्या वरुन त्याच्यामध्ये बोलाचाली व धक्काबुक्की झाली व त्याच दरम्यान धरमनाथ रामशंकर पांडे यांच्या डोक्यात बांबुचा फटका मारुन जबर दुखापत करुन जिवे ठार मारले म्हणुन फिर्यादी श्री प्रमोदकुमार सुताराम पांडे वय २४ वर्षे, धंदा नोकरी, रा. गाळा नं. १४ /ए, एम.आय. उद्योग, वासुदेव इस्टेट अभिनव विद्या मंदीर समोर, केबीन क्रॉस रोड, भाईंदर (पु.) यांनी दिलेल्या तक्रारी वरून भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयांचे मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले असुन त्याचा सेशन केस नं. १०/१९९८ असा आहे.
सदर गुन्हयातील आरोपी १) विजयसिंग श्रीरामचंद्र चौहाण रा. नर्मदा कुंज ए/२०९, सी विंग, कॅबीन रोड, भाईंदर पुर्व. मुळ रा. गांव जबकीबलेपुर पो. गोपालपुर तो, टनलगंज जि. आझमगढ, राज्य यु.पी. पोस्टे मेंहनगर यांस दिनांक ०५/१०/१९९७ रोजी अटक करण्यात आली होती . सदर गुन्हयांत १) मेवालाल ऊर्फ पन्नालाल मुरत चौहाण मुळ रा. गांव नोनरा, ता. लालगंज पो.स्टेशन मेहनगर जि. आजमगढ, २) राजेंद्र रामदुलार पाल रा. गाव पोस्टे हलिया पो. लालंगज, जिल्हा मिर्झापुर (यू.पी.) (संशयीत) हे फरार आरोपी असून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयातील गंभीर व क्लिष्ट स्वरुपांचे खुनाच्या गुन्हयांतील या आरोपींचा शोध घेण्याबाबत बाबत मा. पोलीस आयुक्त सो यांनी पोलीस पथकास आदेशीत केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष- १, काशिमिराचे अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक सदर गुन्हयांतील आरोपी यांचा शोध घेत होते. तपासात सदर गुन्हयातील फरार आरोपी मेवालाल ऊर्फ पन्नालाल मुरत चौहाण यांचा त्याच्या राहत्या पत्त्यावर शोध घेत असतांना पो. हवा. पुष्पेंद्र थापा यांचे गुप्त बातमीदार यांनी माहीती दिली कि, आरोपी मेवालाल ऊर्फ पन्नालाल मुरत चौहाण हा सध्या दिल्ली येथे रहात आहे. त्या अनुशंगाने आरोपी याची माहीती प्राप्त करुन मेवालाल ऊर्फ पन्नालाल याचा शोध घेतला असता तो दिल्ली येथे मिळुन आला आहे. त्यास दिनांक १२/०५/२०२४ रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपी पन्नालाल राममुरत चौहाण यांचेकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी याचा मा. मेट्रोपोलीटन मॅजीस्ट्रेट, नॉर्थ ड्रिस्ट्रीक्ट रोहीणी कोर्ट, नवी दिल्ली यांचे न्यायालयातुन ट्रान्झीट रिमांड घेवुन आरोपीस पुढील कारवाई कामी भाईंदर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कामगीरी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.नि. अविराज कुराडे, स.पो.नि.प्रशांत गांगुर्डे, स. पो. नि. पुष्पराज सुर्वे, पोलीस उप-निरीक्षक राजु तांबे, सहाफौज संदीप शिंदे, पो.हवा./पुष्पेंद्र थापा, पो.हवा. अविनाश गर्जे, पोहवा / सुधीर खोत, पो. हवा./सचिन हुले मसुब किरण असवले, सपोउपनिरी संतोष चव्हाण, सायबर विभाग यांनी केली आहे.
