भाईंदर – मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी -रिक्षा चोरी करुन त्या रिक्षांचा नंबर बदलुन त्या शिफ्ट वरती दुस-याला चालवायला देवुन त्यांचेकडुन शिफ्टचे पैसे घेणा-या टोळीच्या म्होरक्यास शिताफिने अटक करुन ११ गुन्हयांची उकल. अधिक माहीतीनुसार फिर्यादी यांनी दिनांक ०३/०२/२०२४ रोजी रात्री ९.३० वा ते दिनांक ०४/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा च्या दरम्यान त्यांच्या ताब्यातील अॅटो रिक्षा हि भाईंदर पश्चिम येथील राई पुला जवळ सार्वजनिक रस्त्यावर पार्क करुन घरी गेले असताना कोणीतीरी अज्ञात इसमाने ती रिक्षा चोरी करुन नेली म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक ०६/०२/२०२४ रोजी भाईंदर पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करत होती.
मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात दिवसेनदिवस वाहन चोरीचे प्रमाणात वाढ होत असल्याने अशा गुन्हयांना आळा घालणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), व श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी पोलिस पथकास सुचना देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने वपोनिरी.संदिप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यानी घडणाऱ्या प्रत्येक वाहन चोरीच्या गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन आरोपीचा शोध घेत असताना पोहवा/शिवाजी पाटील यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम विरार पूर्व येथील रामु कम्पाऊन्ड, अंबा मदीराचे पाठीमागील बाजुच्या एका कोप-यात चोरीच्या रिक्षा व मोटार सायकल डम करुन त्याचे पार्ट वेगवेगळे करुन विक्री करत आहे. त्यानुसार सपोनि / दत्ताञय सरक व पथक यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन सापळा रचला असता एक इसम रिक्षाची छेडछाड करीत असल्याचे दिसल्याने आश्रफ ऊर्फ सलमान मंहमद परवेज शेख, वय – ३२ वर्षे, रा. रुम क्र.०६, गगनगिरी अपार्टमेन्ट, मकवाना कॉम्पेक्स, गोपचरपाडा, विरार पूर्व ता. वसई जि. पालघर यास शिफातीने ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचेकडे अधिक केला असता त्याच्या बाजुस उभ्या असलेल्या ९ रिक्षा व २ मोटर सायकल त्याने त्याचे साथीदार यांच्या सोबत चोरल्या असल्याचे सांगितल्याने त्याने चोरी केलेल्या ९ रिक्षा, २ मोटर सायकल व मोबाईल फोन असा एकुण ६,८८,५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन मिरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर आयुक्तालय, ठाणे शहर आयुक्तालय येथील १) भाईंदर पोलीस स्टेशन २) दिंडोशी पोलीस स्टेशन, मुंबई शहर ३) एमएचबी कॉलनी पोलीस स्टेशन, मुंबई शहर ४) चारकोप पोलीस स्टेशन, मुंबई शहर ५) चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर(०२) गुन्हे ६) कासारवडवली पोलीस स्टेशन, ठाणे शहर(०३) गुन्हे ७) कापुरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे शहर ८) विरार पोलीस स्टेशन असे एकुण ११ चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.त्याचप्रमाणे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो नौपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), व श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे व.पो.नि. संदिप कदम, पो.नि. राहुल राख, सपोनि. दत्तात्रय सरक, सपोनि. नितीन बेंद्रे, पोउपनि हितेंद्र विचारे, सपोउनि श्रीमंत जेधे, पोहवा/ शिवाजी पाटील, पोहवा / गोविंद केंद्रे, पोहवा / जाराम काळे, पोहवा/सतिश जगताप, पोहवा /आसिम मुल्ला, पोहवा /महेश वेल्हे, पोहवा /संग्राम गायकवाड, पोहवा / अनिल नागरे, पोहवा/हनुमंत सुर्यवंशी, पोहवा /मनोहर तावरे, पोहवा/ राजविर संधु तसेच स. फौ. संतोष चव्हाण नेम – सायबर सेल, मसुब जवान सचिन चौधरी यांनी केलेली आहे.
