विरार : अवैध दारू भट्टीवर विरार पोलिसांची कारवाई दिनांक २३/०७/२०२१ रोजी सकाळी ९. ०० वाजताच सुमारास विरार पोलीस ठाणे अंतर्गत मांडवी दुरक्षेत्र हद्दीतील मौजे तिल्हेर गावचे पूर्वेकडील जंगलात डोंगराळ भागात नाल्याजवळ तीन संशयित इसम हे बेकायदेशिररीत्या ३ गावठी दारू तयार करण्यासाठी गूळ – नवसागर मिश्रीत सुमारे ३०० लीटर रसायन तयार करून साधनांद्वारे भट्टी लावून त्याद्वारे सुमारे ३०० लीटर गावठी हातभट्टची दारू विक्री करीता बेकायदेशिररीत्या तयार करीत असतांना मिळून आले. सदर संशयितांकडून कारवाई दरम्यान सुमारे ७५,०००/- रुपये किमतीचा प्रोव्हीशन गुन्हयाचा मालजप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईबाबत विरार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. प्रशांत वाघुंडे , पोलीस उपआयुक्त परिमंडळं ३ , श्रीमती रेणुका बागडे , सहा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस स्टेशन वपोनि श्री. सुरेश वराडे , पोनि . दिलीप राख , सहा पोनि , श्री. भुवनेश्वर घनदाट , पोना. शिंदे, मराठे, गवळी, पोशि. वाघमोडे , सचिन झनकर , होंडे, मोरे, गणेश पऱ्हाड , व जाखेरे यांनी केलेली आहे.
