दिनांक ०२/१२/२०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे केलेल्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून १४ चारचाकी व १७ दुचाकी वाहने प्राप्त झाल्याने श्री. एकनाथ शिंदे, मा. मंत्री, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांचे हस्ते पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ मधील पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेला सदर वाहनांचे दिनांक ०२/१२/२०२१ रोजी पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ मिरारोड कार्यालय, लक्षमी पार्क, कनकिया रोड, मिरारोड पुर्व येथे आयोजित ‘पोलीस वाहन हस्तांतरण व वितरण सोहळा’ या कार्यक्रमा प्रसंगी वाटप करण्यात आलेले आहे. सदर वाहने आयुक्तालयातील दैनंदिन कामकाजाकरिता तसेच कार्यक्षेत्रामध्ये अधिक प्रभावीपणे गस्त करण्याकरिता उपयुक्त ठरणार आहे. सदर कार्यक्रमात मा. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी/अंमलदार यांचेशी संवाद साधुन पोलीसांनी नेहमी कर्तव्य करतांना जनताभिमुख कामे करावीत याबाबत मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रम प्रसंगी महापौर श्रीमती जोत्स्ना हसनाळे, मा. आमदार श्री. प्रताप सरनाईक, मा. आमदार श्रीमती गीता जैन, मा. पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते, अपर पोलीस आयुक्त श्री. एस. जयकुमार, महानगरपालिका आयुक्त श्री. दिपक ढोले, पोलीस उपआयुक्त, श्री. महेश पाटील, श्री. विजयकांत सागर, श्री. अमीत काळे व इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
