वसई : दिनांक – २०/१२/२०२१ रोजी संध्याकाळच्या वेळेस मोहम्मद साफिद अख्तर हे फोनवरती बोलत कामावरुन पायी घरी जात असतांना चिंचपाडा ब्लुबेल इंडट्रीज पाठीमागे, वालीव, वसई (पुर्व) या निर्जन ठिकाणी पोहचले असता त्यांच्या पाठीमागुन स्कुटीवरती दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांना थांबले व त्या ठिकाणी अगोदरच थांबलेल्या त्यांच्या एका साथीदाराने अख्तर यांच्या पाठीमागुन कशानेतरी डोक्यावर जोरात मारुन जखमी करुन हातातील मोबाईल हिसकावून घेवुन स्कुटीवरती बसुन तीन अनोळखी इसम भरधाव वेगात निघुन पळून गेले. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारच्या दुखापती करुन जबरदस्तीने चोरी करण्याच्या घटना वाढत असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील बारकावे तपासून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराचे मार्फतीने मिळालेल्या बातमीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन आरोपी १) अलोक गोरख जयस्वाल ०२) प्रकाश हरिश्चंद्र सरोज यांना अटक करून आरोपीकडून ८,०००/- रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा ए-१६ मोबाईल फोन तसेच गुन्हयात वापरलेले वाहन असे एकूण ४०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ वसई, श्री. पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, श्री. राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोहवा/मुकेश पवार,पोहवा/ मनोज मोरे, पोना/किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतिष गांगुर्डे, राजेंद्र फड, पो.अंम. गजानन गरीबे, सुर्यकांत मुंढे, सचिन खताळ, जयवंत खंडवी, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
