वसई : पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २६/०२/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी यांनी महिलेस काळी जादू उतरवितो असे सांगून तिला राशिद कंम्पाऊन्ड, गवराईपाडा नाका, नालासोपारा (पु.), ता. वसई, जि. पालघर येथील एका चाळीतील गाळयामध्ये बोलाविले व जादुटोना करण्याच्या बहाण्याने तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करुन जिवे मारण्याची धमकी दिली त्यावरून तिने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी-१) मौलाना रज्जब शेख, २) शहाबुद्दीन यांचेविरुध्द पेल्हार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी यातील आरोपी यांना अटक करण्याबाबत दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाच्या घटनास्थळावर भेट देवुन गुन्हयातील आरोपीनं बाबत माहिती घेतली असता ते राहत्या घरातून पळून गेल्याने त्यांचा लागलीच शोध घेऊन १) रजब अल मो. इसहाक शेख, वय-२७ वर्षे, रा. नालासोपारा (पु.), २) शहाबुददीन अकबर अली शेख, वय-५० वर्षे, रा.नालासोपारा (पु.), हे पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता अशी माहिती समजुन आली की ते प्रताडीत महिलांना तुमच्यावर असलेली काळी जादु उतरुन, त्रासातुन मुक्त करुन देतो अशी अमिषे देवुन, जादुटोना करण्याच्या बहाण्याने महिलांवर लैगिंक अत्याचार करत होते. नमुद आरोपी यांना दिनांक २७/०२/२०२२ रोजी सदर गुन्हयात पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक/शशिकांत अवघडे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि/सनिल पाटील, पोहवा/योगेश देशमुख, तुकाराम माने, पोना/तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, शरद जावळे, पोअं/संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, सागर वाकचौरे, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
