दिनांक २३.१०.२०२१ रोजी , मिरारोड पूर्व याठिकाणी कौशेलेन्द्र राजेंद्र सिंग हा गाळा नं. ०५, मनी आर्केड बिल्डीग, रामदेव पार्क रोड, येथे बेकायदेशीररित्या ऑनलाईन लॉटरी जुगार खेळत व खेळवीत आहे अशी माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांना प्राप्त झाली . हि माहिती वरिष्ठांना कळवुन सदर ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली असुन त्या दुकानातून ११५२०/- रु रोख व जुगाराचे इतर साहित्य असा एकुण ३०,०२०/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन ०१ लॉटरी चालक, ०६ जुगार खेळणारे इसम असे एकुण ०७ आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले व यांचा एक साथीदार फरार आहे असे एकूण ०८ जणांवर मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. श्री. संपतराव पाटील, पो. हवा. उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, मपोना वैष्णवी यंबर, मपोशि सुप्रिया तिवले, चा. पोना गावडे सर्व नेमणुक- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर तसेच पोनि. संतोष एस. चौधरी, सपोउनि. बी. डी. चित्ते, सपोउनि. पी.व्ही निकम, पोहवा. बी.एम. पवार, आर.एन. पदमने, मपोहवा. एस. एस. डोईफोडे, पोना. किणी, एम.पी. शेटटे, चालक पोना. एस. व्ही. पागी सर्व नेम. अ.मा.व.शा. वसई यांनी केली आहे.
