वडाळा : दिनांक १०/०३/२०२२ रोजी मोहम्मद फहिम कैसर शेख वय. २१वर्षे,व अशीफुल रेहमान अब्दुल रज्जाक सय्यद वय.५२ वर्षे यांनी दिनांक २०/०३/२०२२ रोजी आपले मोबाईल चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती त्यावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या प्राप्त सी.सी.टी.व्ही.फुटेज मधील संशयीत इसम हा तोच आरोपी आहे असे निष्पन्न झाल्यावर पोलिसांना तो आरोपी माहीम रेल्वे स्टेशन परीसरात येनार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहीती मिळावी त्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले व त्याची वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली. तपासादरम्यान हे समजले कि वरील दोन्ही गुन्हे हे त्यानेच केलं आहेत अशी कबुली आरोपी ने दिली . त्यावरून नमुद गुन्हे त्यानेच केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यास अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
सदरची कामगिरी वपोनि श्री खुपेरकर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्री हावळे, पो.हवा/ पाटील, देशमुख, कुंडलकर, गर्जे, कांबळे, वाघमारे,गुट्टे, जाधव. यांनी यशस्वी पणे पार पाडली .
