मिरारोड (दि.३) : गावठी कट्टयाचा धाक दाखवुन ज्वेलर्स दुकानदारास लुटणाऱ्या आरोपीस अटक करुन दोन गावठी कट्टे, १ जिवंत काडतुस व मोटर सायकल हस्तगत – मिरारोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमीरा आणि नवघर पोलीस ठाणेची संयुक्त कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक २७/०५/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठारी ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळया दोन अनोळखी आरोपींनी कोठारी ज्वेलर्स दुकानाच्या मालकास गावठी कट्टयाचा धाक दाखवुन सोन्याच्या दुकानात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करुन दुकानदारासोबत झटापटी करुन दुकानदाराचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी केल्याचा गुन्हा घडला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त यांनी सदर गुन्हयातील अनोळखी आरोपी व त्यांनी गुन्हा करतांना वापरलेले हत्यार व वाहनाचा शोध घेत होते. त्याप्रमाणे मिरारोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांचे मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणे व नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी व अंमलदार यांचे गुन्हयातील अनोळखी आरोपी व गुन्हयात वापरलेले हत्याराचा शोध घेणेकरीता विशेष शोध पथक नेमण्यात आले.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान सर्वप्रथम मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि / हनिफ शेख, पोउपनि / किरण वंजारी व पथक तसेच नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि / योगेश काळे व पथक यांनी गुन्हयाच्या घटनास्थळावरील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन गुन्हयात वापरण्यात आलेली स्कुटर हस्तगत केली व त्यावरुन आरोपी आकाश मनोज गुप्ता असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यावरून सदर गुन्हे शाखा युनिट ०१, काशिमिरा यांनी मिरारोड पोलीस ठाणेकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपी आकाश मनोज गुप्ता वय २५ वर्षे सध्या रा. रुम नं.०१/जनशक्ती वेलफेअर सोसायटी, बावशेतपाडा, नालासोपारा पुर्व यास काशिमिरा परिसरातुन ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता मिरारोड पोलीस ठाण्यात हजर केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास स. पो. नि. हनिफ शेख हे करीत आहेत.
मिरारोड पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी सपोनि / हनिफ शेख, पोउपनिरी/किरण वंजारी व तपास पथक यांनी नमुद अटक आरोपी आकाश मनोज गुप्ता याच्या कडुन तपासात गुन्हयात वापरलेले दोन कावठी कट्टे, १ जिवंत काडतुस व गुन्हा करतांना वापरलेली स्कुटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त, श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री. विलास सानप तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग व श्री. महेश तरडे, सहायक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह बागल, गुन्हे शाखा युनिट ०१, काशिमीराचे पो.नि. श्री. अविराज कुऱ्हाडे, स.पो.नि. पुष्पराज सुर्वे व पथक, मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. हनिफ शेख, पो.उप.नि. किरण वंजारी, स.फौ. प्रशांत महाले, पो. हवा. प्रफुल्ल महाकुलकर, राहुल गावडे, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, पो. अंम. अथर्व देवरे तसेच नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील स.पो.नि. योगेश काळे, पो.हवा. पाटील, चव्हाण, पो.अंम. यादव, जाधव यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
