दिनांक १४/०९/२०२० रोजी १८.१० वाजता विरार पोलीस ठाणे हद्दीतील आर.जे. नाका, विरार पूर्व, ता.वसई, जि.पालघर येथे आरोपी ओमप्रकाश भगाराम पटेल, वय २७ वर्षे, सध्या रा. नारंगी फाटक जवळ, विरार पुर्व मुळ रा.मु.पो.सर, ता.लोणी, जि.जोधपूर, राज्य राजस्थान याने त्याचे मारुती झेन कार क्रं. एम.एच-०४/ए एक्स-३२४० मध्ये एकुण २५० ग्रॅम वजनाचा अफीम नावाचा अंमली पदार्थ बेकायदेशीर रित्या विक्री करीता ताबे कब्जात बाळगून मिळून आला. आरोपी याचे ताब्यातुन १)१,२५,०००/- रु किंमतीची एकुण २५० ग्रॅम वजनाचा अफिम नावाचा अंमली पदार्थ परदर्शक प्लास्टीक पिशवी मध्ये मिळुन आलेला किं.सु.२) १,५,०००/- रु एक लाल रंगाची मारुती झेन कार क्रं. एम एच-०४/ए एक्स-३२४० कि.सु. असा एकुण २,७५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी याचे विरुध्द विरार पोलीस ठाणे गु.र.नं. ाा ८०३/२०२० एन.डी.पी.एस कायदा १९८५ चे कलम ८(क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यास दिनांक १४/०९/२०२० रोजी २३.१६ वाजता अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र नाईक, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
