नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत नालासोपारा पश्चिम याठिकाणी महिला नामे शबनम शरीफुल शेख वय २८ वर्षे, रा. शंकरपाडा, शंकर मंदिर जवळ, अर्नाळा, महिला फोनवरुन ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मुली पुरविते व वेश्या व्यवसाय चालवुन त्यावर आपला उदरनिर्वाह करते अशी बातमी अनैतीक मानवी वाहतुक शाखेचे सहायक पोलीस उप निरीक्षक / महेश गोसावी यांना मिळाली होती. ती माहीती पोलीस निरीक्षक श्री. बी.एन. पुकळे यांना देण्यात आली. त्यावरून बोगस ग्राहक व पंच यांना बोलावून त्यांना सदर बातमी सांगण्यात आली व बोगस ग्राहकास महिला वेश्या दलाल हिच्या फोनवर संपर्क साधुन दोन मुलींची मागणी करण्यात आली. या मागणी नुसार बोगस ग्राहक नालासोपारा बस डेपो येथे थांबुन तेथे महिला दलाल दोन मुली वय वर्षे १९, व २३ असे घेवुन आली व ठरलेली रक्कम तिने स्वीकारल्याने व बोगस ग्राहकाने हात वर करुन ठरलेला इशारा दिला.
त्यावेळेस अनैतिक मानवी वाहतुक शाखा वसई पथकाचे पोलीस निरीक्षक. श्री. बी.एन. पुकळे व त्यांच्या पथकाने छापा टाकुन कारवाई केली. छापा कारवाईत एका महिला दलालास अटक करुन २ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली.
सदर कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.आ. श्री. देशमुख यांच्या सुचनांप्रमाणे पो.निरी.श्री. बी.एन. पुकळे व पथकाकडून करण्यात आली असून अटक आरोपीत हिचे विरुध्द नालासोपारा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.सं.कलम ३७० व पिटा अॅक्ट कलम ४,५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
