वसई : वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून एकुण रु.११,००,०००/- रक्कम स्विकारुन फसवणूक करणाऱ्या भामट्याला माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली .
अधिक माहितीनुसार माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जय पाटील, वय २० वर्षे यास मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन देतो सांगून डिसेंबर २०२१ ते आतापर्यत आरोपी सुधांशु जगदंबा चौबे, वय ३२ वर्षे याने त्याची मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया येथे ओळख असल्याचे सांगुन मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया मार्फत श्री. नर्सिंग दुबे चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल कॉलेज येथे मेडीकल फिल्डला ऍडमिशन करुन देण्याचे भासवले व त्यांच्याकडुन एकुण रु.११,००,०००/- रक्कम स्विकारुन मेडीकल कॉन्सील ऑफ इंडीयाच्या नावे बनावट ईमेल आयडी तयार केला. जय पाटील व इतर साक्षीदार यांना ऍडमिशन संदर्भात मेल करुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या रकमेचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली. हे जय पाटील,यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी दिनांक १३/०८/२०२२ रोजी दिलेल्या तक्रारी वरून माणिकपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासात आरोपीने १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविदयालयामध्ये प्रवेश देण्यासाठी आतापर्यन्त एकुण रु. ६२,१२,८२०/- रक्कमेची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी सुधांशु जगदंबा चौबे, वय ३२ वर्षे, रा. शास्त्री नगर, वर्तक कॉलेज मागे, वसई पश्चिम, जि. पालघर यास दिनांक १३/०८/२०२२ रोजी नमूद गुन्हयात अटक करण्यात आली . आरोपीवर अश्या प्रकारचे ३ गुन्हे दाखल आहेत .
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्रीमती पद्मजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो.नि. अभिजीत मडके (गुन्हे), पो.नि. अशोक कांबळे (प्रशासन), गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. सचिन सानप, पो.उ.नि. तुकाराम भोपळे, पो.ह. शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, अनिल चव्हाण व पो.शि. प्रविण कांदे यांनी पार पाडलेली आहे.
