विरार : घरफोडीत चोरी गुन्हातील आरोपी अटक करून ९.८४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास गुन्हे शाखा कक्ष -3 विरार यांना यश अधिक माहितीनुसार दिनांक १२/०८/२०२३ रोजी आर्नाळा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील विठ्ठल हेवन अपार्टमेंटच्या फ्लॅट क्र. ६०३ मध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या बंद दरवाज्याचे कुलुप तोडून फ्लॅटमध्ये घुसून कपाटामध्ये असलेले सोने, चांदीचे दागीणे आणि रोख रक्कम असे एकूण १०,००,०००/- (दहा लाख ) रुपये किमतीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून नेला. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासुन दिवसा घरफोडी चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याने सदर घटनांची मा. वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपी यांचा शोध घेवुन त्यांस अटक करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना तांत्रीक विश्लेषणाद्वारे व आरोपी बाबत मिळालेल्या गोपणीय बातमीवरून महिला आरोपी- मिनता वसंत राजभर, रा. डोंबीवली (प.) हिस दिनांक १६/०८/२०२३ रोजी पोलिसांनी ताब्यात घेवुन तिच्याकडे झालेल्या गुन्ह्या बाबत तपास केला असता तिने हा गुन्हा केल्याचे कबूल केले असुन सदर आरोपी महिलेकडून गुन्हयातील ९,८४,०७७/- रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक महिला आरोपी हिला सदरचा मुद्देमाल घर फोडी चोरी करणा-या एका सराईत आरोपीने दिले असल्याचे निष्पन्न झाले असुन , सदर पाहिजे आरोपी याचा शोध पोलीस करीत आहे .
सदर कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो., (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहा.पोलीस आयुक्त सो., (गुन्हे) मि. भा. वि. व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे पो.नि. प्रमोद बडाख, पो.उप.नि.री. अभिजीत भुपेंद्र टेलर, उमेश भागवत, पो. हवा. अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो.अं. राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, म.सु.ब.सागर सोनवणे, गणेश यादव, प्रविण वानखडे, सर्व नेम – गुन्हे शाखा कक्ष -३ तसेच नालासोपारा पोलीस ठाण्याचे होमगार्ड सनद क्र . ९२३५ रुपाली विलास आवाडे, व स.फौ. संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी केली आहे.
