मिरारोड : ‘न्यु ओमकार बिल्डींग रु. नं. ई/००४, विजयपार्क, मिरारोड पुर्व येथे एक इसम आपले राहत्या घरामध्ये अमुल दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळून त्याची गि-हाईकांना विक्री करतो’ अशी माहिती दिनांक २४/०८/२०२१ रोजी गुन्हे शाखा कक्ष १ चे पो.उप.निरी. हितेंद्र विचारे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की, सदर बातमीची शहानिशा करुन कारवाई करण्याकरिता गुन्हे शाखा कक्ष १ येथील पोलीस पथकाची नेमणुक केली. त्याप्रमाणे सदर पोलीस पथकाने व अन्न सुरक्षा अधिकारी श्री. शंकर राठोड यांनी जावून मिळालेल्या बातमीचे आधारे छापा टाकुन सत्यम मलेश नारला, वय ४० यांस अमुल दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळत असताना रंगेहाथे हात पकडले. सदर ठिकाणावरुन भेसळ युक्त ६०.५० लीटर दूध व भेसळ न केलेले ११.५० लीटर दुध मिळून आले. तसेच दुधामध्ये पाणी मिसळण्याकरीता लागणारे साहित्य (दोन मेणबत्त्या, कात्री, प्लाष्टीक नरसाळे, स्टिलचा पेला, सिगारेट लायटर, स्टोव्ह पिना, एक प्लाष्टिकचा डब्बा, अॅल्युमिनीयम पातेले, प्लाष्टिक मग व रिकाम्या प्लाष्टिक पिशव्या) तसेच दुध विक्रीकरीता वापरण्यात येणारी ५०,०००/- रु. किंमतीची अॅक्टीव्हा स्कुटर असा एकुण ५४,४९१/- रु. किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर बाबत काशिमीरा पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा गुन्हे शाखा कक्ष १ चे पो.निरी. अविराज कुराडे, पो.उप.निरी. हितेंद्र विचारे, सहा.पो.उप.निरी.वेदपाठक, सहा.पो.उप.निरी.राजु तांबे, पो.हवा.किशोर वाडीले, पो.हवा.अर्जुन जाधव, पो.ना.पुष्पेंद्र थापा, पो.ना./सचीन सावंत, पो.शि.प्रशांत विसपुते व पो.शि.विकास राजपुत तसेच महिला सहा.पो.निरी. तेजश्री शिंदे, भरोसा सेल यांनी पार पाडली .
