मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोठया प्रमाणात शहरीकरण होवून मोठया प्रमाणात बाजारपेठा वाढून मोठया प्रमाणात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असून शहरामध्ये अवैध पार्कीग वाढली आहे. तसेच मेट्रो व वरसावे पुलाचे कामामुळे रस्ता अरुंद होऊन चढणाचे, वळणाचे रस्त्यावर अपघात होऊन, वाहने बंद पडून शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. सदरची वाहने रस्त्यावरून तात्काळ हटविण्यासाठी यापूर्वी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२७ प्रमाणे कर्षित वाहने ठेका देऊन योग्य त्या अटी व शर्तीवर वापरण्यात येत होती. त्यांचा ठेका संपल्याने नव्याने ठेका देऊन नवीन दर्जेदार कर्षित वाहने (टोईंग व्हेईकल) नवनिर्मीत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला उपलब्ध करू देणे आवश्यक झाल्याने दिनांक- ०४ मार्च २०२२ ते दिनांक- १४ मार्च २०२२ पर्यंत जीईएम (गर्व्हमेंट ई मार्केट) पोर्टलवर जाहिरात देऊन मिरा-भाईदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी अवजड वाहने टोईंग करण्याकरीता २ (दोन), चारचाकी वाहने टोईंग करण्याकरीता १ (एक) व दुचाकी मोटार वाहने टोईंग करण्याकरीता ८ (आठ) अशी एकूण ११ कर्षित वाहनांकरीता निवीदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर दिनांक- २९/०३/२०२२ रोजी गुणांकन पद्धतीवर उत्कृष्ट ११ कर्षित वाहनांचे निवड करून दिनांक- ११/०४/२०२२ रोजी कर्षित वाहनांचे ठेकेदार यांचेसोबत करारनामा करून घेऊन पात्र ठरलेल्या नविन कर्षित वाहनांची सेवा सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२७ प्रमाणे खालील नमुद प्रसंगामध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे.
कसूरी व प्रसंग
१) मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ प्रमाणे वाहतूक रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे
कसुरदार वाहन चालकाने रस्त्यावर सोडून दिलेली मोटार वाहने.
२) मोटार वाहन चालविण्याचे विनियम २०१७ चे कलम २२ मध्ये उल्लेख केलेल्या पार्कीग बाबत
नियमांचे उल्लंघन केलेली वाहने.
३) मोटार वाहन चालविण्याचे विनियम २०१७ चे कलम २८ मध्ये उल्लेख केलेल्या पाढंगबाबत
नियमांचे उल्लंघन करून धोकादायक स्थितीत उभी केलेली वाहने.
४) महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम २२२ चे नियमांचे उल्लंघन केलेली वाहने.
५) रस्त्यावर ऊभी असलेली अपघातग्रस्त व वाहतूकीला अडथळा निर्माण करणारी वाहने.
६) रस्त्यावर बंद पडलेली व वाहतूक रहदारीला अडथळा निर्माण करणारी वाहने.
७) बेवारस स्थितीमध्ये उभी असलेली वाहने.
८) क्रेन वरील डयुटी अंमलदार शासकीयकाम समजून जी वाहने टोईंग करण्यास सांगेल अशी वाहने.
वरीलपैकी कसूरी करणारे कसूरदारांची मोटार वाहने, मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२७ अन्वये पोलीसांनी नियुक्त केलेले खाजगी टोचन व्हॅन (कर्षित वाहन)/ क्रेनद्वारे खेचुन/ टोचन करून संबंधीत वाहतूक पोलीसांकडून वाहतूक कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात येणार आहेत. कसूरदार मोटार वाहन चालकांना त्यांचे कसूरीबाबत कायदेशीर कारवाई शिवाय खालील तक्त्यामधील दरानुसार टोचन चार्ज (कर्षित रक्कम) कर्षित वाहन मालक (टोचन व्हॅन मालक) यांस अदाकरावी लागणार आहे.
अ.क्र
| वाहनांचा प्रकार
| टोईंग चार्जेस (जीएसटीसह)
|
१ | दुचाकी मोटार वाहने | २००
|
२ | तीनचाकी / ऑटोरिक्षा | २५०
|
३ | चारचाकी कार, जीप
| ३००
|
४ | चारचाकी- मिनी टेम्पो, मिनीबस | ५००
|
५ | सहाचाकी व अवजड वाहन- टेम्पो, ट्रक, टँकर, ट्रेलर, कंटेनर
| ८००
|
मोटार वाहने अनधिकृतरित्या उभी करण्याचे प्रमाण रोखण्यासाठी व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक नियमन करण्यासाठी सदर अधिसुचनेनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
