कर्जत : दिनांक २८/११/२०२१ रोजी पोह. पाटील हे नेरळ रेल्वे स्टेशन येथे ड्युटीवर असतांना त्यांना कंट्रोल रूम मधून कळविण्यात आले कि कर्जत लोकल मध्ये एक सॅक बॅग विसरलेली आहे . सदर लोकल चेक करून पाटील यांनी ती बॅग शोधून प्रवासी मनीष खाडीलकर यांना नेरळ रेल्वे पोलिस चौकीत मध्ये बोलावून ती बॅग त्याची आहे याची खात्री करुन त्यांना परत केली.नमूद प्रवासी यांनी कर्जत रेल्वे पोलिस आणि लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत. २) नेरळ रेल्वे स्टेशन वरती पोह /कोळी हे रात्रपाळी वर असताना त्यांनी कळविण्यात आले कि कर्जत लोकलमध्ये प्रीती पियुष पुराणी.या महिला प्रवासी आपली सॅक बॅग लोकल गाडीत विसरल्या आहेत हि बातमी मिळताच कोळी यांनी सदर लोकल गाडी चेक केली असता त्यामध्ये निळ्यारंगाची बॅग मिळून आली सदर बॅग चेक करून महिला प्रवासी यांनी यांना नेरळ रेल्वे पोलिस चौकीत मध्ये बोलावून ती बॅग त्याची आहे याची खात्री करुन त्यांना परत करण्यात आली .
कल्याण : आसनगांव लोकल मध्ये प्रवासी राहूल प्रेमसागर माळी हे दिनांक २८/११/२०२१ रोजी त्यांची बॅग विसरले होते हि माहिती पो.हवा/ देवकर यांनी फोन करुन पो.ना/पाटील यांना सांगितली यावरुन नमुद अंमलदार यांनी सदरील लोकल गाडीत बॅगेचा शोध घेतला असता बॅग मिळून आली, तरी माहीती कळवुन श्री, राहूल माळी यांना स्टेशन प्रंबधक कार्यालय कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे बोलावुन, बॅगेतील कागदपत्र, चार्जर व इतर सामान खात्री करुन ताब्यात दिले, त्यांनी रेल्वे पोलीसाचे खूप-खूप आभार मानले.
सीएसएमटी : माननीय पोलीस आयुक्त साहेब लोहमार्ग मुंबई यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहीम अंतर्गत CSMT रेल्वे पोलीस ठाणे वपोनि प्रविण भगत यांचे मार्गदर्शना खाली सिएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे लजीर धल्लूसेप हुसेन वय ३६ वर्ष रा. नवी मुंबई यांचा चोरीस गेलेला मोबाईल फ़ोन दि.२९/११/२०२१ रोजी परत करण्यात आला.
वांद्रे : स.पो.फौ.काटकर व मपोना/ झिमन मुद्देमाल अंमलदार यांनी वपोनी. वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली प्रवासी हनुमान प्रसाद स्वामी,वय- ३७ वर्षे,यांचा चोरीस गेलेला मोबाईल चा तपास करून पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहीमे अंतर्गत परत करण्यात आलं याबाबत प्रवासी यांनी मुंबई लोहमार्ग पोलीसांचे आभार मानले आहेत.
