दिनांक १५/८/२०२१ श्री. समीर पांडूरंग सकपाळ, रा. शिवशक्ती कॉम्प्लेक्स, तलाव रोड, भाईंदर पूर्व यांनी तक्रार दिली की, ते दिनांक १४/८/२०२१ रोजी ०८. ३० वा. चे सुमारास अशोक भवन बिल्डींग बी. पी. रोड, भाजी मार्केट, भाईंदर पूर्व येथे असतांना त्याठिकाणी एका वॉल्स वॅगन कारमधुन ४ इसम येऊन त्यांनी तक्रारदार व त्याचे ओळखीचा बंटी यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करुन सुनसान ठिकाणी नेऊन, त्यांना बंदुकीचा धाक दाखवुन ‘कारमधील इसम हे क्राईम बॅचचे पोलीस आहेत, तुझी एन्काऊंटरची ऑर्डर निघाली आहे’ असे सांगुन मांडवली करीता सकपाळ यांच्याकडे १२ लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन सकपाळ यांच्या शर्ट व पॅन्टचे खिशातील ५०,०००/रु. रोख रक्कम व १५,०००/-रुपये किंमतीचे गळयातील सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर पुन्हा सकपाळ यांच्या डोक्याच्या डावे बाजुस बंदुक लावुन जीवेठार मारण्याची धमकी देऊन, आणखी पैशाची मागणी केली व ते पैसे देण्या करीता सकपाळ यांचा मिञ हे घेऊन आला असता पोलीस आले असावे या भितीने आरोपींनी सकपाळ व त्याचे सोबतचा बंटी यांस पुन्हा कारमधुन पळवून नेऊन एका सुनसान ठिकाणी आणुन तिथे त्यांना सोडून देऊन आरोपी निघुन गेले.
सदर बाबत गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेनंतर तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तपास सुरु करण्यात आला होता. सदरचा गुन्हा करणारे आरोपी यांनी गुन्हा करतांना कोणताही पुरावा मागे सोडलेला नव्हता त्यामुळे तपास करणे जिकरीचे झाले होते. तपास सुरु केले नंतर खास तपास पथके तयार करुन त्यांचे करवी तांजीक माहिती व बातमीदार यांचेकडून माहिती गोळा करणेचे काम सुरु केले. दरम्यान तांत्रीक व बातमीदार यांचे माहितीचे आधारे गुन्हा करणारे आरोपीचा सुगावा लागला. त्याप्रमाणे तपास पथक यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हयात एकूण ०९ आरोपी निष्पन्न करुन पैकी ०७ आरोपी यांना अटक केली. त्यांचेकडे तपास केला असता त्यातील एकजण नवी मुंबाई येथील पोलीस व ०१ आरोपी स्थानिक पञकार असल्याचे निष्पन्न झालेले आहे. अटक आरोपींकडे तपास करुन त्यांचेकडून गुन्हा करतांना वापरलेले वाहन कार, पोलीस पाटी, बेडी व इतर साहित्य हस्तगत करणेत आले आहे. अटक आरोपी हे सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा.पो. आयुक्त, भाईंदर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पो.नि. प्रकाश मासाळ, सपोनि. योगेश काळे, सपोनि. भास्कर पुल्ली, सपोनि. गणेश केकाण, पोउपनि. संदिप ओहोळ, पोना. रविंद्र भालेराव, पोना. ऐनुद्दीन शेख, पोशि. युनुस गिरगांवकर, पोशि. संदीप जाधव, पोशि. पाटील यांनी केली आहे.
