वालीव : घरफोडी व चोरीचे गुन्हे वालीव पोलीस ठाणे यांच्या हद्दीत वाढल्यामुळे आरोपींचा शोध घेऊन घडलेल्या गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी वालीव पोलीस ठाणेयांच्या पथकाने गुन्हा घडला त्या घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन आरोपी १) सुभाष शितलाप्रसाद केवट रा. ठि. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या झोपडयात, शिरवणे नेरुळ, नवी मुंबई २) राजु मारुती वंजारी रा. टि. सदर, ३) दिनेश कुमार केवाराम पटेल रा. ठि. विठ्ठल मंदिराचे समोर, वसई पुर्व. ४) नितीन शांतीलाल जैन रा. लोकमान्य टिळक मार्ग, गोरेगाव पश्चिम, ५) शाहरुख सलीम खान रा. ठि. गोणीनगर, जोगेश्वरी पुर्व, ६) उमेश शिवाजी निनताबाजे, रा. इंद्रीरा वसाहत, नवजीवन, वसई पुर्व ७) कृष्णा बिरबल विश्वकर्मा रा. घरतवाडी, बिलालपाडा, नालासोपारा पुर्व ८) गौरव भरत वतारी रा. बिलालपाडा, नालासोपारा यांना ताब्यात घेण्यात आले व सदर आरोपींची गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली व अश्या प्रकारचे त्यांच्यावर एकूण १३ गुन्हे दाखल आहेत हे हि पोलीस तपासादरम्यान उघडकीस आले. गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल, चांदीचे लगड व दागिने, मंदिरातील घंटा, पितळी/ब्रास ई पिन असा एकुण- एकुण ३ लाख ८१ हजार ७४० रुपये किंमतीचा माल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परीमंडळ-२ वसई, श्री. अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळीज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोनि.श्री.राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो.हवा.मनोज मोरे, मुकेश पवार, योगेश देशमुख, पो.ना. सचिन दोरकर, किरण म्हात्रे, अनिल सोनवणे, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पो.अंम.विनेश कोकणी, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, गजानन गरिबे यांनी केलेली आहे.
