दिनांक १०/१०/२०२१ : मराठी एकीकरण समितीकडून मराठी माणसाला घर विकण्यास नकार दिल्याबद्दल घरमालकावर नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर रिंकू संगोई देढीया यांची घर विक्रीसंबंधातील एक पोस्ट मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी वाचली. यात मिरा रोड येथील एका फ्लॅट विक्रीसंदर्भात लिहिण्यात आले होते.परंतु हा फ्लॅट केवळ गुजराती, जैन आणि मारवाडी या समाजातील व्यक्तींनाच विकायचा आहे असे सांगण्यात आले . देशमुख यांनी संबंधीतांशी संपर्क साधला असता या सोसायटीत मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन आदी लोकांना फ्लॅट विकत नाहीत. तसा सोसायटीचा नियम आहे व त्यामुळे तुम्हांला हा फ्लॅट विकता येणार नाही असे सांगण्यात आले. हा असा वेगळाच नियम ऐकून गोवर्धन देशमुख यांनी आपले सहकारी प्रदीप सामंत आणि सचिन घरत यांच्यासह नयानगर पोलिस ठाण्यात जावून तक्रारीवरून नयानगर पोलिस ठाण्यात राहुल देढीया आणि रिंकू संगोई देढीया यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
