धुळे : परराज्यातुन महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणाऱ्या ५आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यात असलेला कोट्यावधीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी जप्त केला आहे. परराज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्येशाने तस्करी होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील, धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेश नुसार दिनांक १७/०४/२०२२ रोजी पो.निरी.श्री. शिवाजी बधवंत, स्थागुशा धुळे यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ४ कंटेनरमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा भरुन मुंबई शहरात विक्री करण्याचे उददेशाने वाहतुक करुन सदर कंटेनर दिल्ली येथुन निघुन धुळे जिल्हयातील हेंद्रुण-मोघण, मालेगाव मार्गे मुंबई येथे जात असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने लागलीच सदर कंटेनरचा शोध घेवुन पुरमेपाडा गावाजवळ नमुद चारही कंटेनर एका मागे एक जात असल्याचे दिसल्याने पथकाने कंटेनर थांबवले व वाहन चालक १) साबिर मजिद खान रा. हरीयाणा २) शकील अहमद लियाकत अली रा. जिल्हा नुहू ३) रुकमोद्यीन अयुब खान रा. जिल्हा नुहू ४) मुरसलिम रुजदार रा. जिल्हा भरतपुर ५) नसिम खान अली मोहम्मद खान रा. जिल्हा पलवल यांना ताब्यात घेऊन कंटेनर मधील माला बाबत विचारपुस करता त्यांनी पोलिसांना डवा-उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना कंटेनरसह मोहाडी नगर पोलीस ठाणेच्या आवारात आणून कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये १) १,३०,४९,२८०/- रु.किं.ची 4K स्टार व SHK सुंगधीत पानमसाला तंबाखु २) ६०,००,०००/- रु.कि.चे एकुण ०४ कंटेनर ३) २५,०००/- रु.किं.चे वेगवेगळया कंपनीचे एकुण ०५ मोबाईल फोनअसा एकुण १,९०,७४,२८०/- रु.किंमतीचा माल हस्तगत केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.निरी.श्री.शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ/रफिक पठाण, पोना/गौतम सपकाळे, पोना/राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन, संजय सुरसे अशांनी केली आहे.
