दादर : मनिवन्ना कंदास्वामी. वय – ५५ हे दिनांक – २८/०९/२०२१ रोजी दादर रेल्वे स्टेशन वर उतरत असतांना त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा शर्टाच्या खिशातील १८,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल आरोपी फैसल मकबुल खान. वय – २६ हा जबरदस्तीने चोरून पळून जात होता. त्याचवेळी दादर रेल्वे स्थानकात साध्या वेशात असलेले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी पाठलाग करुन रंगेहाथ ताब्यात घेतले . सदर आरोपीची अंगझडती घेतली असता वरील मोबाईल फोन मिळून आला आरोपी विरुद्ध मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्ह्यांची नोंद केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी ची कसून चौकशी केली असता हा सराईत गुन्हेगार असून त्याने विविध ठिकाणी असे एकूण २७ गुन्हे केल्याचे पोलिसतपासा दरम्यान उघडकीस आले आहे.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. श्री. सुनिल डोके, पो. हवा. एस. व्ही. बने, पो. हवा. दबडे, पो. ना. एस. टी. महाडीक, पो. ना. व्ही. एस. जाधव, पो. ना. एम. डी. पाटील, पो. ना. ओ. व्ही. वळवी, पो. ना. डी. एन. पाटील, पो.शि. वाय. एन. बच्चे यांनी नमुद गुन्ह्याच्या तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
