भाईंदर : चोरीच्या संशयावरुन ज्वेलर्स कंपनीत काम करणाऱ्या कामगारास मारहाण करुन जिवे ठार मारणाऱ्या आरोपीना नवघर पोलीसांनी अटक केली . अधिक माहिती नुसार दिनांक ०७.०५.२०२२ रोजी लाईफ केअर हॉस्पीटल, भाईंदर पुर्व यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेला जखमी इसम हा दाखलपुर्व मयत असल्याबाबतचे (एम.एल.सी.) द्वारे नवघर पोलीस ठाण्यास कळविले होते. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे परिपोउनि/हरिभाऊ भोसले हॉस्पीटलमध्ये जावून डॉक्टरांकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की औषधोपचारासाठी आलेला कृष्णा पालाराम तुसामड, वय ३० वर्षे, हा दाखलपुर्व मयत झालेला असुन त्यास केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झालेला आहे. त्यावरुन मयत याचे वडील पालाराम धनाराम तुसामड, वय ६४ वर्षे यांची तक्रार नोंद करुन नवघर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीनं विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभिर्य लक्षात आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी वपोनि/नवघर पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी/ अंमलदार, इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सक्त सुचना दिल्या होत्या. हा गुन्हा उषा किरण बिल्डींगमध्ये असलेली श्री. नागमणी ज्वेलर्स कंपनी, इंद्रलोक फेज-६, तपोवन शाळेजवळ, भाईंदर पुर्व येथे घडला होता त्यावरून पोलिसांनी जाऊन ज्वेलर्स कंपनीत काम करणा-या कामगारांची माहिती घेऊन कंपनीत हजर असलेल्या सर्व कामगारांकडे गुन्हयाचे अनुषंगाने प्राथमीक तपास केला असता यातील मयत हा नमुद कंपनीत सफाई काम करतांना कंपनीतील ज्वेलरी चोरी करतो या कारणावरुन त्यास कंपनीत काम करणा-या कामगारांपैकी काही कामगारांनी मारहाण केलेली आहे अशी प्राथमिक माहिती समजली होती. परंतु यातील मयत यास नक्की कुणी मारहाण केलेली आहे याबाबत काहीएक माहिती पोलिसांना मिळुन आली नव्हती. नमुद कंपनीत काम करणा-या कामगारांकडे तपास करीत असतांना कंपनीत काम करणारे काही कामगार बाहेर गेले असल्याचे समजले असता त्या कामगारांची माहिती घेऊन त्यांना शोधण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. तसेच नमुद कंपनीमध्ये बसविण्यात आलेले काही सी.सी.टि.व्ही. कॅमेरे काढुन काही सी.सी.टि.व्ही. रेकॉर्डीग डिलीट केल्याचे दिसुन आल्याने सदर बाबत अधिक तांत्रीक तपास केला असता यातील मयतास कंपनीचे मालकासह १२ ते १३ कामगारांनी मिळुन त्यास बांधुन लाठ्या-काठया, लोखंडी रॉड, लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचे समजुन आले. सदर गुन्हा करणाऱ्या आरोपीपैकी १) चुंडीचरण सनातन बिंद, वय ३८ वर्षे, २) दिलीप निर्मलचंद बिद, वय ४२ वर्षे, ३) सनी बाकेलाल गुप्ता, वय २४ वर्ष, ४) विश्वजित हरिपद भौमीक, वय ४९ वर्षे, ५) निहार निरंजन मंडळ, वय ३२ वर्षे, ६) पिंटु दुलाल माल, वय २७ वर्षे, ७) सोमेन मधाई गराई, वय ३२ वर्षे, ८) सोमिम वासुदेव प्रामाणीक, वय १९ वर्षे यांना ताब्यात घेऊन गुन्हयात अटक केलेली आहे. त्यानंतर ९) बिद्युत ऊर्फ नेडु गुरुपत दास, वय २८ वर्षे, १०) अशिष ऊर्फ तोतोन मानस डे, वय २९ वर्षे, ११) महेंद्र ऊर्फ ठाकुर अनुप चटर्जी, वय ४० वर्षे या आरोपींचा तपास करुन त्यांना सुध्दा गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन उर्वरीत दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, सपोनि/पडळकर, पोउनि/ अभिजीत लांडे, परिपोउनि/भोसले, सहाफौज/आदक, पोहवा/भुषण पाटील, पोशि/संदिप जाधव, पोशि/ सचिन पाटील, पोशि/सुरज घुनावत, पोशि/ओंमकार यादव यांनी केलेली आहे.
