मिरारोड : दिनांक २०.१०.२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांना माहिती प्राप्त झाली की, मिरारोड परिसरात राहणारी महिला ही ऑनलाईन जाहिराती करून नंतर गिऱ्हाईकाने मोबाईलवर संपर्क साधला की, ते गिऱ्हाईकास मिरा भाईन्दर परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून किंवा गिऱ्हाईकाच्या सोयीनुसार वेश्यागमनाचा मोबदला स्वीकारुन गिऱ्हाईकास मुली पुरवितात.सदर बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक व यांच्यासह मिरारोड पूर्व या ठिकाणी असणाऱ्या अन्तपुरा लॉज वर सत्यता पडताळुन पोलीस पथकासह छापा टाकला असता महिला वेश्यादलाल हिस वेश्यागमनाच्या मोबदल्यात पैसे स्विकारुन पुरुष ग्राहाकांना मुली पुरवित असतांना ताब्यात घेण्यात आले तसेच वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह ०२ पिडित मुलीची सुटका करण्यात आली. सदर बाबत पोहवा उमेश हरी पाटील यांच्या तक्रारीवरून महिला आरोपी व तिची फरार असलेली साथीदार यांच्या विरुध्द नयानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. श्री. संपतराव पाटील, पो.हवा. उमेश पाटील, पोहवारामचंद्र पाटील, पोशिकेशव शिंदे, मपोना वैष्णवी यंबर, मपोशि सुप्रिया तिवले, चालक पोना गावडे सर्व नेमणुक- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर, मसपोनि./ तेजश्री शिंदे व मपोशि जुन्नेदी- भरोसा सेल यांनी केली आहे.
