पालघर येथे राहणारे काशिनाथ घरत यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. घरत यांच्या विरुद्ध त्यांच्या प्रेयसीने अत्याचार व फसवणुकीची तक्रार दाखल केली होती त्यानुसार काशिनाथ घरत यांच्या विरुद्ध कलम ३७६ व ४१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. काशिनाथने लग्नाचे आमिष दाखवुन शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप प्रेयसीने केला होता त्यावेळी या प्रकरणात १९/०२/१९९९ रोजी सत्र न्यायाधीशांनी आरोपीस अत्याचारातून निर्दोष मुक्तता केली होती परंतु फसवणूक केल्या प्रकरणी दोषी ठरवुन एक वर्षाचा सश्रम कारावास हि शिक्षा सुनावली होती . या सत्र न्याधीशाच्या आदेशाला त्याने मुबंई उच्च न्यायालयात आव्हान दिले जेथे न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने त्याला फसवणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले . न्या. प्रभुदेसाई यांनी सांगितले कि वस्तुस्थिती दर्शविते कि महिला आणि आरोपी यांचे तीन वर्षांपासून शारीरिक संबंध होते आणि दोघांचे प्रेमसंबंध होते त्यामुळे महिलेच्या बोलण्यावरून तिला कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीत ठेवण्यात आले असल्याचे सिद्ध होत नाही . पहिले म्हणजे महिलेला खोटी माहिती देऊन लग्नाची चर्चा झाली आणि दुसरी दिलेले वचनच चुकीचे होते आणि या भ्रमात महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास सहमती दिली या दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतील असे या खटल्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला. काशिनाथ घरत या प्रकरणात आरोपीला महिलेशी लग्न करायचे नव्हते हे दाखवणारा कोणताही पुरावा तसेच महिलेस फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याचे पुरावे सापडले नाही म्हणुन आरोपीस दोषी ठरवण्यात येणार नाही असा निर्णय मुबंई उच्च न्यायालयाने दिला आहे.
