मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्या पासुन सकाळी घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, मौल्यवान वस्तु चोरी करणारी टोळी सक्रीय झाली होती. सदर घटनांची मा. वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपी यांचा शोध घेवुन सदर प्रकारच्या गुन्हयांना पायबंद घालण्यासाठी त्याअनुषंगाने वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पोलीस पथकाने गुप्त बातमीदार यांच्या कडून मिळालेल्या खात्रीशीर माहीतीच्या आधारावर आरोपी १) सत्यनाथन व्यंकटेश बोयार वय- ३३ वर्षे, रा.राज्य- तामिळनाडु २) मंजुनाथन गणेश गोविंदस्वामी, वय- २५ वर्षे, रा. राज्य- तामिळनाडु ३) सुरेश कुप्पन बोयार वय- २६ वर्षे, रा., राज्य- तामिळनाडु ४) रोहीत रामु तमिलन वय- १८ वर्षे, रा. राज्य- तामिळनाडु या ४ आरोपींना दिनांक ३०/०९/२०२१ रोजी अटक करण्यात आले. पोलीस तपासादरम्यान आरोपी यांनी सदरचे गुन्हे हे त्यांचे अन्य दोन साथीदार यांच्या मदतीने केले असल्याचे कबूल केले .सदर आरोपी यांच्या कडून चोरीस गेलेले ६ लॅपटॉप व ३८ मोबाईल फोन असा एकुण ५,२३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांच्या नावावर अश्या प्रकारचे एकूण १७ गुन्हे असल्याचे उघडकीस आले.
आरोपी हे मुळचे जिल्हा- वैल्लोर, राज्य- तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. मुक बधिर असण्याचा बनाव करुन मदत मागण्याच्या हेतुने ईमारतीमध्ये अथवा घरामध्ये प्रवेश करुन घरातील व्यक्तीचे लक्ष चुकवून सकाळच्या वेळी घरामध्ये प्रवेश करुन घरातील मोबाईल फोन, लॅपटॉप, सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू चोरी करतात असे पोलीस चौकशीत त्यांनी सांगितले . अटक आरोपी व त्यांचे ईतर साथीदार यांच्याविरुद्ध राज्यातील विवीध पोलीस ठाण्यामध्ये मध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी यांना पुढील कारवाई करीता अर्नाळा पोलीस ठाणे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या पुढील तपास अर्नाळा पोलीस ठाणे करीत आहे.
वरील कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा.पोलीस आयुक्त, (गुन्हे), मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रमोद बडाख, पोउपनिरी. शिवाजी खाडे, पोउपनिरी. उमेश भागवत, सफौ. अनिल वेळे, पो.हवा. अशोक पाटील, पो.ना. प्रदीप टक्के, पो.ना.मुकेश तटकरे, पो.ना. सागर बारवकर, पो.ना. मनोज सकपाळ, पोना. शंकर शिंदे, पोना. सचिन घेरे, पोशि. राकेश पवार, सर्व नेम- गुन्हे शाखा, यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
