पोलिस बातमी पत्राच्या पाठपुराव्याला अखेर यश- पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे याच्यांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Crime News Latest News Political News ताज्या घडामोडी

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे अंतर्वली येथून प्रकाश जानकू कोकरे यांची  अल्पवयीन मुलगी वय 16 हिस घराशेजारील राहणाऱ्या अलीम राजू शेख तुरूणाने अपहरण करून पळवून नेले या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला मागील महिन्यात  गुन्हा दाखल झाला होता.

मुलीचे वडील व चुलते दिनांक १-०५-२०२२ रोजी नेवासा पो स्टेशन मध्ये मुलीच्या तपासा संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात आले असता पोलीस निरीक्षक यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मुलीच्याच घरच्यांना बंद खोलीत सकाळी ११ ते ३ या वेळेत डांबून ठेवले होते.आणि सदर गुन्ह्यात आरोपीचा तपास करायचा सोडून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मुलीचे आजोबा यांना आपल्या वरती मोठे  कलम दाखल करू तुमच्या सर्व कुटुंबीयांनी सहा महिने जेलमध्ये टाकू  तुमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले आहे असे म्हणत तुमचे कलम कमी करण्यासाठी सुनील गर्जे राहणार मौजे कुकाणा यांना मध्यस्थी करून पो निरीक्षक बाजीराव पवार यांनी तडजोड रक्कम रुपये रोख स्वरूपात एक लाख पंचवीस हजार रुपये ( १,२५,००० ) रुपये संबंधित सुनील गर्जे यांच्याकडे जमा केली.पीडित मुलीच्या आजोबांनी सदर रक्कम ही मुलीच्या लग्नासाठी जमवलेली असताना पोलीस अधिकाऱ्यांनी बँकेतून काढण्यास भाग पाडले आणि हे चौकशीत देखील निष्पन्न झाले.वरिल विषय हा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवून  पो.निरीक्षक पवार  यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीचा रजेवर पाठवले आणि ह्या संदर्भात चौकशी लावण्याचे निर्देश दिले. आणि दिलेली रक्कम बाजीराव पवारांनी पीडीत तरुणीला परत देखील केली.आणि चौकशीत निष्पन्न झाल्या प्रमाणे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे यांच्या दोघांवर भा.द.वि 384,385, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply