विरार : विरार पुर्वेकडील मनवेलपाड्याच्या मॉ जय अंबे बिल्डींगच्या बाहेरील रस्त्यावर दिनांक २०/०७/२०२१ रोजी सकाळी ०८:३० वा. च्या सुमारास पायी चालत जाणा-या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तीच्या पाठीमागून पायी चालत आलेल्या एका अनोळखी चोरट्याने जबरीने खेचून त्याच्या साथीदारासह मोटारसायकलवरुन पळून
नेले याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विरार पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्हयाचे घटनास्थळावरील प्राप्त पुरावे, आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपध्दती आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुन वसईच्या भोईदा पाड्यातून दोन संशईत सोनसाखळी चोरांना आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांना फाऊंटन हॉटेल परीसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
यातील सर्व अटक आरोपी हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई, ठाणे व इतर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी, घरफोडी, आर्म अँक्ट इ. प्रकारचे गंभिर गुन्हे दाखल आहेत. नमुद गुन्ह्यातील अटक आरोपी यांची टोळी असून त्यातील सोनसाखळी चोर मोटारसायकलवरुन पायी चालणा-या महिलांच्या गळ्यातील दागिने जबरीने चोरुन त्यांच्या साथीदार आरोपींकडे विल्हेवाट लावण्यासाठी देतात आणि दागिन्यांची विल्हेवाट लावून मिळालेल्या पैशांची ऐकमेकांत वाटणी करुन घेतात. सदर गुन्हयात आरोपी नामे १) रियाझ रमजान शेख वय ३६ वर्षे, रा. वाघरळ पाडा, वसई (पु.), २) शानु ऊर्फ समिर मोहम्मद वसीम कुरेशी, वय ३० वर्षे, रा. भोईदा पाडा, वसई (पु.) ३) मोहम्मद जमीर बशीर शेख, वय ५५ वर्षे, रा. रु.क्र. जोगश्वरी (पु.), ४) राकेश प्रेमबहादुर सिंग, वय २९ वर्षे, रा. चांदीवली अंधेरी (पु.), मुंबई अशांना अटक करण्यात आली असून तपासादरम्यान त्यांच्याकडून १) ३,१२,०००/- रूपये किंमतीचे ८० ग्रॅम वजनाच्या एकुण ०७ सोन्याच्या चैन व २) २,४०,०००/- रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल असा एकुण ५,५२,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ९ गुन्हे उघड करण्यात विरार पोलीस स्टेशनला यश आलेले आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ३ व श्रीमती रेणुका बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, संदेश राणे, पो.हवा. सचिन लोखंडे, पो.ना. विजय दुबळा, हर्षद चव्हाण, भुषण वाघमारे, संदिप शेरमाळे, पो.शि. इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, रवी वानखेडे, सुनिल पाटील, पवन पवार, सागर घुगरकर यांनी केली आहे.
