विरार : दिनांक १/७/२०२१ रोजी ४.०० व. ते दिनांक २/७/२०२१ रोजी ९.३० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी ‘श्री साई पूर्णानंद ट्रेडर्स ‘ या गळ्यामध्ये ठेवलेले २,४०,०००/- रुपये किमतीचे एकूण ६० गोण्या लसूण घरफोडी करून चोरून नेल्या शेती रीतसर तक्रार फिर्यादीने विरार पोलीस ठाणे येथे केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान विरार पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत, तांत्रिक बाबींचा उपयोग, व बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार तीन आरोपीना धानीव तलावाच्या पाठीमागील चाळ , नालासोपार पूर्व येथून ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता सदर आरोपी यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी १) राकेश भादई यादव वय : ३७ रा. नालासोपारा पूर्व , मुळ रा : दलितपूर्वा ,उत्तरप्रदेश २) राजेश बबन कदम वय : ३३ रा. नालासोपारा मुळ रा. चारकोप, कांदिवली पूर्व ३) विकासकुमार संतोषकुमार दुबे वय : ३६ रा. नालासोपारा मुळ रा. तिलंगा ,उत्तरप्रदेशया तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
यातील अटक आरोपी हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून कांदा , लसूण ,मसाले, सुका मेवा तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंची चोरी करण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. त्याकरिता दिवसाच्या वेळी परिसरामध्ये फिरून माहिती गोळा करणे व रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून त्यामध्ये असलेला माल आणलेल्या वाहनात भरून चोरून घेऊन जाणे अश्या पद्धतीने सदर आरोपींची चोरी करण्याची सवय आहे , अटक आरोपी कडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला माळ व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन असे एकूण २,७५,३४५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री.प्रशांत वाघुंडे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -३, श्रीमती रेणुका बागडे , सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश वराडे , गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पो उपनि , अभिजीत भूपेंद्र टेलर , संदेश राणे, पो. हवा. सचिन लोखंडे , पो.ना . विजय दुबळा ,हर्षद चव्हाण ,भुषण वाघमारे , संदीप शेरमाळे , पो. शि. सुनील पाटील , इंद्रनील पाटील , विशाल लोहार, रवी वानखेडे , सागर घुगरकर, पवन पवार, यांनी केली आहे.
