भाईंदर (दि.२१) – गुन्हे प्रकटीकरण शाखा भाईंदर पोलीस ठाणे यांनी ४०० लिटर गावठीहातभट्टी दारु अवैद्यरित्या विक्री करीता वाहतुक करीत असताना २ आरोपींवर केली कारवाई.सविस्तर माहितीअशी की,आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकी च्या अनुषंगाने मिरा-भाईन्दर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिसरात अवैद्य धंद्यांवर आळा बसवण्या साठी कारवाई करण्या बाबत मा. वरिष्ठांनी मार्गदर्शनात्मक सुचना पोलीस पथकास दिलेल्या होत्या. त्यानुसार भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकास नियमित पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते .
या कारवाई अंतर्गत दिनांक १८/०३/२०२४ रोजी नाईट डयुटी पेट्रोलिंग करीत असताना पोहवा. के. पी. पवार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत “एका सिल्वर रंगाच्या कार मधुन गावठी हातभट्टीची दारुची मोरवा गावाच्या दिशेने वाहतुक होणार आहे” अशी गोपनीय माहीती मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने रात्रपाळीस डयुटीस असलेले सपोनि.श्री नरोटे व डीबी स्टाफ असे सुभाष मैदान चौक येथे सापळा रचुन थांबले असता दि.१९/०३/२०२४ रोजी १२. ३५ वाजेच्या दरम्यान एक सिल्वर रंगाची सेवरोलेट कार संशयास्पद रित्या येताना दिसली. पोलिसांनी सदर कार चालकास थांबण्याचा इशारा केला तेव्हा कार चालकाने त्यांची कार पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकानी सदर कारला आडवुन कार रस्त्याच्या कडेला घेण्यास सागितली तेव्हा कार चालकाने सदरची कार रस्त्याच्या कडेला थांबवली. कार चालक १) मच्छिद्र लहु मढवी, वय ४० वर्षे, रा- मु. पोस्ट अंजुरगाव भिंवडी ता. जिल्हा – ठाणे व त्याच्या बाजुस बसलेले २) सुरज सुनिल कोळी, वय २४ वर्षे, रा. अंजुरगाव भिवडी ता. जिल्हा – ठाणे यांना कारचे पाठीमागे डिकी मध्ये व पुढील सिटवर असणाऱ्या मालाबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देवु लागले तेव्हा पाठीमागील डिकी उघडुन पाहीली असता त्यात प्लास्टिकच्या पिशव्या मध्ये गावठी हातभट्टटीची दारु भरलेली आढळुन आली. सदर सर्व गोण्या उघडुन पाहीले असता प्रत्येक गोणी मध्ये ४ प्लास्टिक पिशव्या (प्रत्येकी १० लिटर) एका गोणीमध्ये ४० लिटर दारु अशा एकुण १० गोण्या मिळुन एकूण ४०० लिटर गावठीहातभट्टी दारू व वाहनासहीत एकूण २,१५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसा सविस्तर पंचनामा करून दोन्ही इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री प्रकाश गायकवाड, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ०१ व श्रीमती दिपाली खन्ना, मा.सहा. पोलीस आयुक्त भाईंदर विभाग, श्री सुर्यकांत नाईकवाडी, व.पो. नि. भाईंदर पो. ठाणे, श्री विवेक सोनवणे, श्री सुधीर गवळी, पो.नि. भाईंदर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सपोनि. नरोटे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हवा. राजेश श्रीवास्तव, के. पी. पवार, के. आर. पवार, पो.ना. रामनाथ शिंदे, पो. अं. सुशिल पवार, संजय चव्हाण यांनी केलेली आहे.
