मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा बसविण्यासाठी मोटार सायकल चोरांचा शोध घेण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार श्री. डॉ.महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे प्राप्त केलेल्या तांत्रिक तपास व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे करणारा इसम हा योगेश मांगल्या हा असल्याची माहीती मिळालेली होती. सदर बातमीच्या अनुशंगाने दिनांक ०२/०४/२०२१ रोजी १) योगेश ऊर्फ गॅनी प्रभाकर मांगेला वय.३६ वर्षे रा. रुम नं. ए-५१८, नेहरु नगर, भाईदर पोलीस स्टेशनच्या बाजुला, भाईदर पश्चिम, ता.जि. ठाणे यास ताब्यात घेण्यात आले होते.
सदर आरोपीने भाईदर पोलीस ठाणे गु.रजी.नं. : ७६०/२०२० भा.द.वि.सं कलम ३७९ या गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयांत अटक करण्यात आलेली होती. तपासादरम्यान आरोपी याने सन २०१७ पासुन मुंबई, भाईंदर व मिरारोड परिसरात रात्रीच्या वेळी मोटार सायकल (ऍक्टिव्ह स्कुटर) चोरी करुन त्या अर्नाळा ता. वसई येथे राहणारे १) सचिन नारायण वैती, २) कल्पक नारायण वैती यांचे मदतीने वसई व अर्नाळा परिस प्रत विक्री केलेल्या
असल्याची कबुली दिली.
पुढील तपासात १) सचिन वैती, २) कल्पक वैती यांना ताब्यात घेतले असताना त्यांनी एकुण २५ मोटार सायकल्स/स्कुटर्स त्यात २० ऍक्टिव्ह, २ डिओ, १ मॅस्ट्रो, १ युनीकॉर्न, १ बजाज पल्सर अशा कंपनीची वाहने काढुन दिली आहेत. सदर गुन्हयांत नमूद तीन आरोपींना अटक करण्यात आले असुन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे.
सदरची कामगीरी श्री. डॉ.महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामचंद्र देशमुख सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे), यांच्या सुचनाप्रमाणे श्री. अविराज कुराडे पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण शाखा-१, सहा.पो.निरी. विलास कुटे, सहा.पो.निरी. प्रवीण स्वामी, पो.उप-निरी, हितेंद्र विचारे, आणि पथक यांनी केली असून गुन्हयांचा पुढील तपास पो हवा./१८५० संजय शिंदे हे करीत आहेत.
