वालीव पोलीस ठाणे हद्दीत पुर्वी खैरपाडा, बिलालपाडा नालासोपारा पुर्व, येथील मनोज जैन यांचे मोकळया जागेमध्ये अनोळखी पुरुष वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन त्याचे चेह-यावर व डोक्यावर अवजड दगड टाकुन त्याची ओळख पटु नये याकरीता त्याचा चेहरा छिन्न विच्छीन्न केले आणि त्यास जिवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत सदर ठिकाणी टाकुन दिले होते.
त्याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा रजि. क्रमांक ३१३/२०२१ भादविस कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात बेवारस मयताची ओळख पटवणे व गुन्हा उघडकीस आणणे महत्वाचे होते.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लागलीच वालीच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे २ पथके तयार करुन प्रथम मयत इसमाची ओळख पटविणे करीता प्रयत्न केले. मयताच्या रेखाचित्राचे व गुप्त बातमीदाराच्या आधारे मयताची ओळख पटवली असता मयत इसमाचे नाव रामकरण रामलखन वर्मा वय-४२ वर्षे रा. रईसनगर, खैरपाडा वसई पूर्व असल्याचे निष्पन्न झाले.
मयताची ओळख पटवुन पुढील अवघ्या काही तासात गुन्हा उघड करुन आरोपी नामे अरमान इरफान अहमद वय-३२ रा. धुमाळनगर, वसई पूर्व ता. वसई यास ताब्यात घेण्यात आले.
सदरचा खुन हा आरोपीची मयत इसमाच्या पत्नीवर असलेल्या वाईट नजरेतुन झाला असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. खुनासारखा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाल्यापासुन अवघ्या २४ तासात उघड करण्यात वालीव पोलीसांना यश आले आहे.
आरोपी अरमान इरफान अहमद वय-३२ यास अटक करून न्यायालयात हजर केले असता.दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री दादासाहेब करांडे वालीव पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री.प्रशांत वाधुंडे, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-३ विरार, श्री. अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुंळीज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास चौगुले, पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सरोदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दादासाहेब करांडे, गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोहवा/८१३ योगेश देशमुख, आणि पथक यांनी केली आहे.
