दिंनाक 20/07/2021 रोजी श्री. किशन कुमार विजयबहादुर यादव रा.बागरी चाळ, काशिमीरा ,मिरारोड , पुर्व. यांनी त्यांची बजाज ऑटो रिक्षा चोरीस गेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करित असतांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी अल्तमश हनीफ शेख, वय -23, रा. शांतीनगर , मिरारोड , पूर्व. याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. आरोपीची कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपी कडून सदर गुन्हयात चोरिस गेलेली रिक्षा तसेच त्याने चोरी केलेले विवो कंपनीचे 03,सॅमसंग कंपनीचे 02, रेडमी कंपनीचे 04, मायक्रोमॅक्स कंपनीचे 02, आय फोन कंपनीचा 01, रियल मी कंपनीचा 01, एम आय कंपनीचा 01, मोटोरोला कंपनीचा 01, आय टेल कंपनीचा 01, इंटेक्स एक्वा पॉवर कंपनीचा 01 असे 1,56,000/- रूपये किंमतीचे एकुण 17 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोउनि. पंकज किलजे करित आहेत. अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वी भांईदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1, श्री. विलास सानप. पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि, श्री. संजय हजारे , पोनि,विजय पवार. पोनि, श्री.जितेंद्र पाटील, यांचेसह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि, महेंद्र भामरे. सपोनि, प्रशांत गांगुर्डे ,पोउनि, जावेद मुल्ला ,पोना, विश्वनाथ जरग, पोशि, जयकुमार राठोड, पोशि,अनिल नागरे, पोशि,हनुमंत तेरवे, पोशि,समीर यादव, पोशि,जयदिप बडे, पोशि,सनी सुर्यवंशी सर्व नेमणूक काशिमीरा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
