सॊशल मीडिया चा गैरवापर करून आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीस पकडण्यात सायबर गुन्हे शाखेस यश.

Cyber Crime

भाईंदर :   ऑनलाईन जाहिराती मार्फत लोकांना फसवणाऱ्या व्यक्ती विरुद्ध  नवघर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार तक्रारदार यांना  Instagram ID mentor mayur या इन्स्टाग्राम आयडीवरुन Investment 2k returns 10 k, Returns will be given in just 10 mins, if any one interested then msg me “ Ready to invest 2k” Offer valid till midnight अशी जाहीरात प्रसारित करुन त्यांच्याकडून  ७०००/- रुपयांची रक्कम स्विकारून फसवणुक केली याबाबत  सायबर गुन्हे शाखा येथे दिनांक २२/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता . सायबर गुन्हे शाखेने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीबाबत तात्काळ चौकशी करून तांत्रीक माहीतीच्या आधारे दिनांक १९/११/२०२१ रोजी संशयित मयुर अनिल पटवा, वय २६ वर्षे रा. खेतवाडी मुंबई यास ताब्यात घेवुन त्याची  कसून चौकशी केली असता त्यांनी सदर प्रकार केल्याचे उघडकीस आले  तसेच त्याचा मोबाईल पोलिसांनी चेक केला  त्यामध्ये Instagram ID mentor mayur या इन्स्टाग्राम अकाउंट लॉगईन मिळून आले आहे.

तसेच आरोपी कडे केलेल्या तपासामध्ये त्याने खालील मोबाईल क्रमांक/खाते क्रमांक/युपीआय आयडी/इन्स्टाग्राम आयडी/ईमेल आयडी गुन्हा करण्यासाठी वापरले असल्याची माहिती दिली आहे.

इन्स्टाग्राम आयडी :  Instagram ID”mentor_mayur” प्रोफाईल मध्ये (mentor mayur – BusinessMan, Studies in Stanford University, EARN MONEY, DM ME, ) असा संदेश लिहून ठेवला आहे.

युपीआय आयडी : Bharatpe 09895405649@yesbankltd,

बँक खाते क्रमांक :   बँक ऑफ इंडीया खाते क्रमांक 003910110001335

मोबाईल क्रमांक : 9895405649 766637577

ईमेल आयडी :mayurpatwa77@gmail.com

वरील इन्स्टाग्राम आयडी “mentor_mayur”वरुन लोकांना Investment 2k returns 10 k, Returns will be given in just 10 mins if any one interested then msg me “ Ready to invest 2k” Offer valid till

midnight असे जाहीरातीद्वारे आमिष दाखवुन त्यांना वरील युपीआय आयडीवर पैसे पाठविण्यास सांगुन सदरची रक्कम स्विकारून फसवणूक करीत होता.सदर संशयित आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करीता नवघर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन  त्याच्या  विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सायबर गुन्हे शाखा, मिरा,भाईंदर-वसई,विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून  जनतेला आवाहन करण्यात आले कि, Instagram ID”mentor mayur”तसेच वरील युपीआय आयडी, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व बँक खात्यांशी संबधित व्यवहार करून गुंतवणुक करुन आर्थिक फसवणुक झालेली असल्यास नजीकच्या पोलीस ठाणे अथवा सायबर गुन्हे शाखा, मिरा,भाईंदर-वसई,विरार पोलीस आयुक्तालयाचे कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.

सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, पोउपनिरी संतोष भिसे, पोउपनिरी/प्रसाद शेनोळकर, पोशि/गणेश इलग, पोशि/प्रविण आव्हाड, मपोशि/ पल्लवी निकम, मपोशि/सुवर्णा माळी, मपोशि/माधुरी धिंडे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.

सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- 022-2811 0135

सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक :- 900 488 0135 सायबर गुन्हे शाखा ई-मेल आयडी :-cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.5 / 5. Vote count: 2

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply