दिनांक : २३/०९/२०२१ रोजी महिला प्रवासी या बोरिवली वरून घरी जाण्यासाठी चर्चगेट स्लो ट्रेन मध्ये प्रवास करत असताना ट्रेन पोयसर नाल्याजवळ सिग्नल मिळाला म्हणून थांबली असताना एक अनोळखी इसम लोकलमध्ये महिला डब्यात चढला व त्याने अचानकपणे सदर महिलेच्या जिन्सच्या पॅन्टच्या उजव्या खिश्यात ठेवलेला मोबाईल फोन काडून खेचू लागला महिलेने त्याचा प्रतिकार केला असता त्याने महिलेस मारहाण केली व त्यांचा उजवा हात पकडून ट्रेनच्या दरवाज्याच्या दिशेने ओढत नेले सदर प्रकार पाहून लोकलमध्ये प्रवास करणारी एका प्रवासी महिलेने त्या महिलेचा हात पकडून ठेवल्याने व लोकल सुरु झाल्यामुळे सदर आरोपी याने १४०००/- रु. किंमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून चोरी करून चालू लोकलमधून उडी मारली . उडी मारताना सदर आरोपी ट्रॅकवर पडला व तेथून उठून तो गडबडीने पूर्व बाजूस पळून गेला सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार गुन्ह्यांचा तपास करून आरोपीस कांदिवली रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूकडील रेल्वे यार्डातून ताब्यात घेण्यात आले तसेच त्याने चोरलेला १४०००/- रु. किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्या साठी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. कैसर खलिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई, मा. श्री. प्रदीप चव्हाण, पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली बोरीवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल कदम यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक तुषार बाविस्कर, पोहवा जाधव, पोना पाटील, पोशि वाडकर, पोशि शेख, मपोहवा मोरे, पोना पोळ या पथकाने केली आहे.
