वसई : वसई रोड रेल्वे स्टेशन येथे दिनांक ११/०९/२०२१ रोजी सुमारे १०.०१ वाजता डहाणू ते अंधेरी जाणारी फास्ट लोकलच्या ट्रॅक वर एक महिला आली व उभी राहिली.सदरची घटना कर्तव्यवरील पोहवा नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ धावत जाऊन ट्रेनच्या मोटर मनला इशारा करून लोकल ट्रेन थांबवण्यास सांगितले व स्वतः पोलीस हवालदार नाईक यांनी ट्रॅक मध्ये उडी मारून नमूद महीलेस ट्रॅकवरून बाजूला घेतले व तिचे प्राण वाचवले.
नमूद महिलेकडे अधिक चौकशी केली असता तिचे वय ६० वर्षे राह. नालासोपारा तिच्या पतीचे निधन झाले असून व तिचा मुलगा पुणे येथे असल्याकारणाने वर नमूद ठिकाणी एकटी राहते. सदरची महिला तणावात असलेचे लक्षात आल्याने तिचे समुपदेशन करून तिला सुरक्षितते साठी मराठा फाउंडेशन वृद्धाश्रम, विरार येथे ठेवण्यात आले आहे. पोलीस हवालदार नाईक यांनी दाखवलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी पोलिसांचे आभार मानले .
