पोलिसांचे लाच घेण्याचे प्रमाण वाढले या मध्ये महिला पण सामील.

Crime News Latest News Political News ताज्या घडामोडी

पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या  लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात- मनसे नेत्यांना अटक करून आली होती प्रकाश झोतात.

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना बुधवारी २० हजारांची लाच घेताना मुद्देमालासह अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. स्मार्ट पोलिस म्हणून मिरवणाऱ्या प्रणिता पवार या मनसेच्या आंदोलक महिलांना पकडल्यावर पोज देवून फोटो काढला होता त्यावरून त्या प्रकाशझोतात आल्या पण आता त्यांच्यावरच तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे . मिळालेल्या माहिती नुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात प्रणिता पवार या  सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या .भद्रकाली पोलिस ठाण्यात  दोन ते तीन महिन्यांपूर्वी तक्रारदाराविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता व त्याचा तपास प्रणिता पवार होत्या.गुन्ह्याच्या तपासात  मदत करते तसेच न्यायालयात लवकरात लवकर दोषापत्र दाखल करणाच्या बदल्यात प्रणिता पवार यांनी  दिनांक १३ ला तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची मागणी केली या मुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सदर बाबतील रितसर तक्रार दाखल केली त्यावरून बुधवारी तिवंदा पोलिस चौकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील, राजेंद्र गिते, शरद हेंबाडे, अजय गरुड, प्रकाश महाजन, परशुराम जाधव यांनी सापळा रचून प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना २० हजारांची लाच घेताना अटक केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता. १७) आडगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली होती. या घटनेस २४ तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.नाशिक पोलिसांत सलग दुसऱ्या दिवशी दोन घटना घडल्याने वरिष्ठ अधिकारी संतप्त झाले आहेत.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 2

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply