दिनांक- १३/९/२०१९ चे शासन निर्णयानुसार पालघर जिल्हा व ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयास मान्यता मिळाली असून प्रत्यक्षात कामकाज दिनांक-१/१०/२०२० रोजी पासून सुरू झाले आहे. आयुक्तालय सुरू झाल्यापासून पोलीस संचालक कार्यालयाकडून आवश्यक मनुष्यबळ, वाहने, अनुदान पुरविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
आयुक्तालयाच्या नवनिर्मिती अद्यावत पोलीस नियंत्रण कक्ष, वेबसाईट व परिषद पक्ष यांचे पोलीस संचालकांनी या भेटीत उद्घाटन केले. तसेच आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधला आणि आयुक्तालयाच्या कामाला सर्वंकष आढावा घेतला.
पोलीस संचालक, महाराष्ट्र राज्य यांचे आयुक्तालय भेटीच्या दरम्यान अपर पोलीस संचालक (आस्थापना) अपर पोलीस संचालक (नि.व.स) महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त व अपर पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, पोलीस अधीक्षक, पालघर आणि आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार ह%A र होते.
पोलीस संचालकांनी पहिल्या चार महिन्यात आयुक्तालयाची घडी बसविण्याकामी चांगली कामगिरी केली आहे, याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस संचालकांनी आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती चांगली राखली पाहिजे, गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे, समाजातील असामाजिक तत्त्वांवरती अंकुश ठेवला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. नवनिर्मित आयुक्तालयास मनुष्यबळ पुरविणे व इतर मदत करणे बाबत पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण व पोलीस अधीक्षक, पालघर यांना पोलीस संचालकांनी सूचना दिल्या.
नवनिर्मित पोलीस आयुक्तालयाची घडी बसविण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल याबाबत पोलीस संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी आश्वस्त केले आहे
