माणिकपूर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली असुन त्यांनी यु टयुब वरुन मोटार सायकल चोरी करण्याचे प्रशिक्षण घेवुन मोटार सायकल चोरी करत असल्याचे सांगितले आहे.
सदर आरोपींना अटक करुनवेगवेगळया गुन्हयातील एकुण १२ मोटार सायकल माणिकपुर पोलीस ठाणे येथे जप्त करण्यात आल्या आहेत. अटक आरोपी नामे १) रॉबीनसन पीटर लोपीस, वय ३४ वर्षे, धंदा- मजुरी, रा. रुम नं. २९२, वसई निर्मळ रोड, आंबेडकर नगर, डोंगरी, भुईगाव, वसई गाव, ता. वसई, जि. पालघर २) रोशन भरत तिवारी, वय २७ वर्षे, धंदा- मजुरी, रा. रुम नं. ६०२, भुमी बिल्डींग, पवित्रधाम सोसायटी, टिवरी गाव, नायगाव पुर्च, ता. वसई, जि. पालघर ३) नवीन राजेश मिश्रा, वय २४ वर्षे, धंदा- शिक्षण, रा. रुम नं. २०३, धारा बिल्डींग, पवित्रधाम सोसायटी, टिवरीगाव, नायगाव पुर्व, ता. वसई, जि. पालघर व ४) धनंजय तारकेश्वर गोस्वामी, वय १८ वर्षे, धंदा- मजुरी, रा. रुम नं. बिल्डींग, पवित्रधाम सोसायटी, टिवरी गाव, नायगाव पुर्व, ता. वसई, जि. पालघर यांच्याकडुन माणिकपुर पोलीस ठाणेमधील ०६, तुळींज पोलीस ठाणेतील २, वालीव पोलीस ठाणेतील २, नालासोपारा पोलीस ठाणे व विरार पोलीस ठाणेतील प्रत्येकी १ असे एकूण १२ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कारवाई श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- २, वसई, श्री. प्रदीप गिरीधर, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग व श्री. भाऊसाहेब आहेर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन सानप आणि पथक यांनी केलेली आहे.
