तांब्याच्या वायरची चोरी करणारी टोळी नंदुरबार पोलिसांन कडून जेरबंद – दोन लाख पर्यंत ची केली होती चोरी

Crime News Latest News Political News ताज्या घडामोडी

नंदुरबार :सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील कॉपर वायरची चोरीकरणाऱ्या ८ जणांना  स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून  १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अधिक  माहिती नुसार दि.२१/०५/२०२२ रोजी वना भावराव पाटील,यांनी तक्रार दाखल केली कि रात्री बलवंड गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर क्रमांक सीके ११ येथून १,००,०००/- रुपये किंमतीची पवन चक्कीत वापरात येणारी ५२५ मीटर ताब्यांची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली . तसेच दि. ११/०५/२०२२दुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ढंढाणे गावाचे शिवारादेखील सुझलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवर क्रमांक के-03 चे एच टी यार्ड मधील ट्रान्सफॉर्मर बॉक्समधून १०,०००/रुपये किंमतीचे ताब्यांच्या बसबार पट्टया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने श्री. तुकाराम सुकदेव झावरे,यांनी तक्रार दाखल केली होती त्याचप्रमाणे  दि. १२/०५/२०२२ तिलाली शिवारातील टॉवर क्र. ४३०  मधून २५, ०००/- रु. किमतीची ५० मीटर तांब्याची वायर चोरी झाल्याची तक्रार राजेंद्र चिंतामण पाटील वय-४९ यांनी दाखल केली होती वरील तीन हि तक्रारी वरून चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री.पी.आर.पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक मा. श्री.विजय पवार यांनी गुन्हा उघडकीस आणुन मालमत्ता हस्तगत करणे व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाणे यांना आदेशीत केले होते.त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी.आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली, गुन्हयातील चोरीस गेलेली ताब्यांच्या बसबार पट्टया ह्या रजाळे येथील पवन ऊर्फ प्रशांत कोळी व त्याचे मित्र यांनी मिळून चोरी केल्या आहेत.सदर बातमी मिळाल्यावरुन मा.पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन गुन्ह्यात सहभाग असलेले सर्व आरोपी व गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल विकत घेणारे यांची माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ रजाळे व ढंडाणे येथे पाठवुन संशयीत आरोपी पवन कोळी याचा शोध घेतला असता आरोपी १) पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी, वय-१९ वर्ष,  २) सुकदेव आंनदा कोळी, वय-२४ वर्ष, ) शेरसिंग ऊर्फ पिन्या चंदुठाकरे, वय-२६ वर्ष यांना ताब्यात घेऊन तांब्याच्या तारे बाबत विचारले असता प्रथम त्यांनी उडउडवीची उत्तरे दिली नंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी विश्वासात घेवुन विचापुस केली असता त्यांनी दिनांक ११ मे २०२२  रोजी ढंडाणे गावाचे शिवारातील सुझलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवर  मधील ट्रान्सफॉर्मर बॉक्समधून चोरी केल्याचे मान्य केल्याने पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी याचेकडून १०,०००/- रुपये किंमतीचे ताब्यांच्या बसबार पट्ट्या कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आल्या सदर आरोपींची विचारपूस करून त्याचे इतर साथीदार १) देविदास भाईदास भिल, वय-2९ वर्ष,  २) हिरामण दिलीप भिल, वय-३३ वर्ष, ३) आनंदसिंग सदु भिल, वय-४०, रा. बलवंड ४) पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी, वय-१८ वर्ष, ५) रविंद्र लाला भिल, वय-२४ वर्ष, ६) शेरसिंग ऊर्फ पिन्या चंदु ठाकरे, वय-२६ वर्ष,७) सुकदेव आंनदाकोळी, वय-२४ वर्ष, ८ सईद मुसा खाटीक, वय-३२ वर्ष,यांना  तांब्याची तार विकत घेणारे ८ आरोपिना अटक करण्यात आली असून  असुन त्यांचेकडून चोरीस गेलेला एकूण १ लाख ३५ हजार रुपये किंमतीची ४८२ किलोग्रॅम वजनाची सुजलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवर मधुन चोरी केलेली तांब्याची तार तसेच ताब्यांचे बसबार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यातील फरार आरोपी १) राहुल कोळी, २) लोटन पाटील,३) अशोक वडार,४) मोग्या भिल यांचा देखील लवकरच शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येइल असे पोलिसांनी सांगितले आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे मा.पोलीस अधिक्षक श्री.पी.आर.पाटील, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, महेंद्र नगराळे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अमंलदार अभय राजपुत, आनंदा मराठे, शोएब शेख चापोना रमेश साळूखे यांचे पथकाने केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply