मुंबई : एटीएम (ATM)कार्डची अदलाबदली करून सामान्य नागरिकांना गंडा लावणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पायधुनी पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे दि.१२/०३/२०२२ रोजी संध्याकाळी बँक ऑफ बडोदा एटीएम सेंटर मोहम्मद अली रोड पायधुनी मुंबई येथे एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना एका अनोळखी इसमाने बोलण्यात गुंतवून त्यांचे कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड बदली करून सदर डेबिट कार्डचा वापर करून एकूण १ लाख १२ हजार १३० इतकी रक्कम काढून घेतली व त्यांची फसवणूक केली याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यांचा तपास मा.सपोआ,मा.वपोनि, पोनि गुन्हे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरु असतांना पो ना इरफान खान यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे नमूद गुन्ह्यातील २ आरोपीना नागपाडा येथून गुन्ह्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असताना सापळा रचून १) आताउल्ला मेहमूद आलम खान, वय – २७ , बिरु राजेंद्र पांडे, वय – ३५, यांना ताब्यात घेण्यात आले व पायधुनी पोलीस ठाण्यास आणून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ वेगवेगळ्या बँकेचे डेबिट कार्ड,२ मोबाईल फोन,१ ATM कार्ड चार्जेर,१ पेटीएम मशीन असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई वपोनि श्रीकांत राजरामपाटील,सपोनि निलेश बनकर, पोउपनि अरुण जाधव, पो.ह./इरफान खान, पो.ना./निकम, पो.शि./राठोड, पो.शि./घोडे, पो.शि./पाटील, पो.शि./अलदर यांनी केली.
